Advertisement

'पीओपी'च्या मूर्तींचं कुठेही विसर्जन करता येणार नाही : हायकोर्ट

नागपूर महापालिकेनंदेखील 'पीओपी'च्या मूर्तींची विक्री, तसंच साठवणूक करण्यास मज्जाव केला आहे.

'पीओपी'च्या मूर्तींचं कुठेही विसर्जन करता येणार नाही : हायकोर्ट
SHARES

गणेशोत्सवादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींची विक्री मूर्ती म्हणून करता येणार नाही, तर एक वस्तू म्हणून करता येईल. मात्र, ग्राहकांनी अशा मूर्तींची पूजा करू नये, तसंच 'पीओपी'च्या मूर्तींचं कुठेही विसर्जन करता येणार नाही, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे.

पर्यावरणाला हानीकारक असल्याच्या कारणावरून केंद्र, तसंच राज्य सरकारनं 'पीओपी'च्या मूर्तींवर बंदी घातली आहे. याच अंतर्गत नागपूर महापालिकेनंदेखील 'पीओपी'च्या मूर्तींची विक्री, तसंच साठवणूक करण्यास मज्जाव केला आहे.

या निर्णयाविरुद्ध विनोदकुमार गुप्ता आणि श्री गणेश मूर्तिकार फाउंडेशननं नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. मूर्तिकारांकडील 'पीओपी'च्या मूर्तींच्या साठ्याची विक्री करू द्यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी झाली.

'पीओपी मूर्तींवर बंदी अचानक लावण्यात आलेली नाही. हा निर्णय २०१२ पासून लागू आहे. त्यामुळे मूर्तिकारांचे आर्थिक नुकसान झाले आहे, असं म्हणता येणार आहे. मूर्तिकारांचे आर्थिक हित जपण्यासाठी म्हणून घालून दिलेल्या अटींवर विक्री करण्याची मुभा देता येईल,' असं खंडपीठानं नमूद केले. मूर्तींच्या सरसकट विक्रीची मागणी मात्र खंडपीठानं फेटाळली.



हेही वाचा

'इतक्याच' गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी

यंदाही मानाच्या हंड्या फुटणार नाहीत; राज्य सरकारनं नाकारली परवानगी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा