Advertisement

'मराठी शाळा टिकल्या तर मराठी भाषा टिकेल'


'मराठी शाळा टिकल्या तर मराठी भाषा टिकेल'
SHARES

परळ - मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल असे उद्गार सोमय्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. वीणा सानेकर यांनी काढले. 'जागर मातृभाषेचा' या विषयावर आधारित शिक्षक आणि पालक यांच्यात संवाद साधण्यासाठी परळ येथील डॉ. शिरोडकर स्मारक मंदिर शाळेच्या सभागृहात बुधवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी शिरोडकर प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका जयश्री परब, समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष योगेश नाटेकर आदी मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दिवसेंदिवस मराठी शाळा कालबाह्य होत चालल्या आहेत. हे कुठेतरी थांबायला हवं. आपण महाराष्ट्रात जन्माला आलो म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण आपल्या मुलांना मातृभाषेतील शाळेत दाखल केले पाहिजे. प्रत्येकाने ही जबाबदारी घेतल्यास मराठी शाळा आणि भाषेची गळचेपी होणार नाही असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा