मुंबईत जगन्नाथ रथयात्रा

दादर - 1967 साली सॅन फ्रांन्सिस्को मध्ये पहिल्यांदा रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हापासून भारतातही ही रथ यात्रा देशातल्या प्रत्येक सेंटरमध्ये आयोजित करण्यात येते. मुंबईत सालाबादाप्रमाणे यंदाही शिवाजी पार्क येथून इस्कॉन सेंटरच्यावतीने जगन्नाथ रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या रथ यात्रेत शेकडो भाविक सामिल झाले होते. या रथयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे दोन वर्षापूर्वी या रथयात्रेचे आयोजन पाकिस्तानमध्ये देखील करण्यात आले होते. यंदाच्या जगन्नाथ रथ यात्रेचे आयोजन इस्कॉनच्या गिरगाव शाखेच्या वतीने करण्यात आले होते. ही रथ यात्रा दुपारी तीन वाजता शिवाजी पार्क पासून सुरु करण्यात आली. शिवसेना भवन, पोर्तुगीज चर्च, गोखले रोड, खेड गल्ली, आणि प्रभादेवी पासून पुन्हा शिवाजी पार्क येथे फिरवण्यात आली. यावेळी जगन्नाथ स्वामींची प्रतिकृती रथात ठेवण्यात आली होती.

Loading Comments