Advertisement

सामान्यांचं दिवाळं, ज्वेलर्सची दिवाळी


SHARES

मुंबई - मंगळवारी रात्री पंतप्रधान मोदींनी अचानक 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातुन बाद करण्याचा निर्णय घेतला आणि जनतेमध्ये खळबळ उडाली. या निर्णयाचा फायदा ज्वेर्लसंना झालेला दिसतो. बुधवारी सकाळपासून नोटा खपवण्याच्या दृष्टीनं ग्राहकांनी सोनं खरेदीकरण्यासाठी एकच गर्दी केली. त्यामुळे मंगळवारी 30 हजार 800 रुपये प्रति तोळा असलेले सोने 34 हजाराचा पल्ला गाठेल असा कयास आहे.

दिवाळी नुकतीच संपली असली तरी सराफा व्यापारांची अजून दिवाळी सुरूये. हा परिणाम आहे पंतप्रधान मोदींनी घेतलेला एतिहासीक निर्णयाचा. चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा खपवण्यासाठी बऱ्याच लोकांनी सोनं खरेदीचा पर्याय निवडला. मात्र बुधवारी दुपारपासून अचानक ज्वेलर्सनं 500 आणि 1000 रिपयांच्या नोटा स्वीकारणं बंद केलं आहे. त्यामुळे लोकांची पंचायत झालीय.

या अफरातफरीचा फायदा घेउन काही व्यापा-यांनी सोनं 42 हजार प्रति तोळा विकल्याचं बोललं जातंय. हे टाळायचं असेल तर जनतेनं या परिस्थितीत सयंम ठेवणं आणि सरकारकडून येणा-या सूचनांनवर लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं आवाहन अर्थतज्ज्ञांकडून केलं जातंय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा