Advertisement

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा फोन

त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा फोन
SHARES

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन केला गेल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

कोल्हापूर पोलिसांसह बॉम्बशोधक पथकानं मंदिराचा कानाकोपरा पिंजून काढला. पण बॉम्बशोधक पथकाला मंदिर परिसरात पाहणी केल्यानंतर अशी कुठलीही वस्तू किंवा पदार्थ सापडला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील पणजी (गोवा) कंट्रोल रुमला हा फोन आला होता. त्यानंतर मंदिर प्रशासनानं भाविकांसाठी मंदिर तात्काळ बंद केलं. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण मंदिर परिसराची तपासणी करण्यात आली. त्यावेळी बॉम्ब किंवा बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू सापडली नाही.

साडेतीन शक्तीपीठापैकी महत्वाचे पीठ असणाऱ्या अंबाबाई मंदिरात तोफेच्या सलामीने घटस्थापना झाली आहे. मंदिर समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी ही तोफ दिली. या सलामीनंतर करवीर नगरीत नवरात्रोत्सवाला सुरवात होते.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मुहूर्तानं अंबाबाई मंदिरात घटस्थापना केली जाते. मंदिरात घटस्थापना झाल्याचा संदेश करवीरवासियांना मिळावा यासाठी तोफेची सलामी देण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून जपली जाते. अंबाबाई मंदिरातील या तोफेच्या सलामीनं नंतरच भाविक आपल्या घरांमध्ये घटाची स्थापना करत असतात.



हेही वाचा

Navratri 2021 : ‘या’ मंदिरांमध्ये घ्या आदिमातेचे दर्शन

नवरात्रोत्सवानिमित्त पोलिसांचा चोख बंदोबस्त

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा