Advertisement

Dahi handi 2023 : प्रो कबड्डीप्रमाणेच प्रो दहीहंडी स्पर्धेचा थरार लवकरच सुरू होऊ शकतो

मुख्यमंत्री घेणार मोठा निर्णय

Dahi handi 2023 : प्रो कबड्डीप्रमाणेच प्रो दहीहंडी स्पर्धेचा थरार लवकरच सुरू होऊ शकतो
SHARES

दहीहंडीचा समावेश खेळामध्ये(include Dahi Handi in the game) करण्याचा निर्णय शिंदे-फडवणीस सरकारने घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी विधानसभेत दहीहंडीचा खेळात समावेश करण्यात आल्याची घोषणा केली. त्यामुळे लवकरच राज्यात प्रो कबड्डी प्रमाणे प्रो दहीहंडी स्पर्धेचा थरारा रगण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे याबाबत  मोठा निर्णय जाहीर करणार आहेत. 

दहीहंडी पथक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची बैठक विधनभवनात होणार आहे.  या बैठकीत प्रो दहीहंडी या बद्दलच्या  नियावली  वर चर्चा होणार आहे.  महाराष्ट्र शासन कडून पहिल्यांदा प्रो दहीहंडी स्पर्धा घेण्याची घोषणा मुख्यमंत्री करणार आहेत. 

दही हंडी दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी घेतला होता. यानंतर दहीहंडीचा समावेश खेळामध्ये(include Dahi Handi in the game) करणार असल्याचा  ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी घेतला होता. 



हेही वाचा

मुंबईचा राजा 'गणेश गल्ली'ची यंदाची थीम असेल जरा हटके, पहा व्हिडिओ

पालिकेकडून मूर्तीकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी, 'या' गोष्टींची होणार पडताळणी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा