Advertisement

यंदा गणेशोत्सव-दहीहंडी जल्लोषात साजरी करा, मुख्यमंत्र्यांनी कोरोना निर्बंध घेतले मागे

पुढील महिन्यात येणाऱ्या अनेक सणांच्या आधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली की कोविड-19 संबंधित सर्व निर्बंध मागे घेण्यात आले आहेत.

यंदा गणेशोत्सव-दहीहंडी जल्लोषात साजरी करा, मुख्यमंत्र्यांनी कोरोना निर्बंध घेतले मागे
SHARES

यंदा गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाला कोणतेही निर्बंध असणार नाही. राज्यात नवे सरकार आल्यापासून शिंदे आल्यापासून हा दुसरा मोठा निर्णय आहे. या अगोदर  शिंदे सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला होता. 

मागील दोन वर्षापासून गणेशोत्सवादरम्यान कोरोनाचे (Coronavirus) निर्बंध असल्याने राज्यात दहीहंडी आणि गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्यात आला आहे.   मात्र यावर्षी निर्बंधमुक्त गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. 

राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा  करण्यासाठी एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहे.  परिवहन विभागास वाहतूक नियोजनाचे आदेश देण्यात आले आहे.  प्रमुख महामार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महामार्ग पोलिसांनाही सूचना देण्यात आले आहे.  यंदा गणेशोत्सव 31 ऑगस्ट 2022 ते रविवार 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत साजरा होणार आहे. 

यासोबतच,  कोकणात  जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोल माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.   त्यामुळे या सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे तसेच  प्रवाशांच्या सोयीसाठी गणपती उत्सवानिमित्त एकूण 214 विशेष  रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत या गाड्या चालवण्यात येणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा