Advertisement

रमजान ईदसाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

राज्यात कोरोनामुळे कडक निर्बंध लागू केले आहेत. जमावबंदी आणि संचारबंदी असून एकत्र जमण्यास बंदी आहे.

रमजान ईदसाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
SHARES

राज्यात कोरोनामुळे कडक निर्बंध लागू केले आहेत. जमावबंदी आणि संचारबंदी असून एकत्र जमण्यास बंदी आहे. येत्या १३ किंवा १४ मे रोजी (चंद्रदर्शनावर अवलंबून) मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद साजरी केली जाणार आहे. कोरोनामुळे रमजान ईद साजरी करण्यासाठी सरकारने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

मार्गदर्शक सूचना

१. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईद करीता मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करुन ‘ब्रेक द चेन’ आदेशाचे काटेकोर पालन करणे उचित ठरेल.

२. नमाज पठणाकरता मशिदीत तसंच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये.

३. रमजान ईद निमित्ताने मुंबई मापालिकेने तसंच स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असून त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्या वेळेव्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.

४. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी  राज्यात कलम 144 लागू असल्याने तसंच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत. याशिवाय नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.

५. रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.

६. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी.

७.  रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

८. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान ईदच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.



हेही वाचा - 

सहकारी बँक कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासासाठी मुभा नाही

देशात प्रवासासाठी RT-PCR चाचणी बंधनकारक नाही

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा