Advertisement

जोगेश्वरीत भव्यदिव्य शोभायात्रा


जोगेश्वरीत भव्यदिव्य शोभायात्रा
SHARES

जोगेश्वरी - गुढीपाडवा हिंदू नववर्षानिमित्त जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातर्फे भव्य अशी स्वागत यात्रा काढण्यात आली. या स्वागत यात्रेचा शुभारंभ गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण तसेच रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते पालखीतील गणरायाची तसेच गुढीची पुजा झाल्यानंतर करण्यात आला.

या स्वागत यात्रेत पारंपारीक आदिवासी यांचे तारपा नृत्य, कोळी नृत्य, नाशिक ढोल, बँन्ड, पुणेरी ढोल, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, पारंपारिक वेशभुषा घालून मोठ्या संख्येनं लोक सहभागी झाले होते.

या वेळी महिला मोटर सायकल स्वार स्पर्धा तसंच छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत मनिषा वायकर, सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर, बेस्ट समिती सदस्य प्रविण शिंदे, नगरसेवक सदानंद परब, नगसेविका रेखा रामवंशी, उपविभाग प्रमुख विश्वनाथ सावंत, शिवसेनेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या यात्रेला सद्भक्ती मंदिर, हिंदु फ्रेंडस सोसायटी रोड, जोगेश्‍वरी (पूर्व) येथून सकाळी ७ सुरूवात झाली. ही शोभा यात्रा, बॅरिस्टर नाथ पै चौक, जोगेश्‍वरी गुंफा, शलक्य हॉस्पिटल, सर्विस रोड, नेमाजी ब्रीज, महाराजा भुवन, गांधीनगर शाखा, इच्छापुर्ती हनुमान मंदिर, मार्केट जनशक्ती चौक, मेघवाडी शाखा, शनी महात्मा रोड, आयकर वसाहत, मेघवाडी, हेमा इंडस्ट्रीज, सर्वोदय नगर, कोकणनगर, म्हाडा कॉलनी, पी.एम.पी.जी. कॉलनी, पुनमनगर, दुर्गानगर नाका, ग्रीनफिल्ड येथून काढण्यात आली. या शोभायात्रेची समाप्ती शामनगर, इच्छापुर्ती गणेश मंदिर, जोगेश्‍वरी -विक्रोळी लिंक रोड येथे झाली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा