Advertisement

बाबूलनाथ मंदिरात महाशिवरात्री जल्लोष


SHARES

गिरगाव - चौपाटीजवळ बाबूलनाथ रोडवर रम्य आणि देखणे उंच असे शिवालय म्हणजे बाबूलनाथ मंदिर उभारण्यात आले आहे. मुंबईचा ऐतिहासिक वारसा जपणारे हे प्राचीन शिवमंदिर आहे. दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री या मंदिरात जल्लोषात साजरी करण्यात आली. महाशिवरात्री निमित्त या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. आदल्या दिवशीच्या रात्री 12 पर्यंत भाविकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

महाशिवरात्री असल्याने मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय भव्य मोठे आणि सुंदर फुलांनी सजवण्यात आले आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर बाबूलनाथाचे शिवलिंग दिसते. गुरुवारीच रात्री शिवलिगांला सुंदर सजवण्यात आले होते. हा साज बघण्यासाठी मुबंई बाहेरील भाविक गर्दी करतात. सिवरात्री निमित्त होणारी गर्दी पाहता कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा