Advertisement

पिंपळेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी


पिंपळेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी
SHARES

भोईवाडा - मुंबईतील बहुतांश महादेव मंदिरांत शुक्रवारी पहाटेपासून "ॐ नमः शिवाय‘च्या जयघोषात सुरू झालेले अभिषेक, महारुद्राभिषेक, होमहवन, अशा विविध धार्मिक उपक्रमांद्वारे महाशिवरात्र साजरी करण्यात आली. परळ पूर्व नायगाव भोईवाडा येथील पिंपळेश्वर महादेव मंदिरात देखील मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी शुक्रवारी सकाळ पासूनच गर्दी केली होती. शिवलिंगाला दूध किंवा उसाच्या रसाचा अभिषेक आणि त्यानंतर बेलाची पाने वाहण्यात येत होती. महाशिवरात्रीला शंकराला कवठ अर्पण करण्याची प्रथा आहे, त्याचेही पालन केले जात होते.

नायगाव - भोईवाडा येथील एका पिंपळाच्या झाडाखाली साधारण 100 वर्षांपूर्वी महादेवाची स्वयंभू पिंड निर्माण झाली. सदरील ठिकाणी भक्तांनी पूजा अर्चा करण्यास सुरुवात केली. मात्र कोणतेही मंदिर येथे बांधण्यात आले नव्हते. त्यामुळे मंदिरा समोरील पत्रा चाळीत राहणाऱ्या राहिवाशांनी 1998 साली ओम शिव सेवा साई मंडळ स्थापन केले असून, त्या अंतर्गत येथे मंदिर बांधले. सदरील मंदिरातील महादेवाची स्वयंभू पिंड पिंपळाच्या झाडाखाली प्रकट झाल्याने या मंदिराला पिंपळेश्वर महादेव मंदिर असे नाव देण्यात आले. असे मंडळाचे अध्यक्ष विकास देशमुख यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा