• मनोरीत लक्ष दीपोत्सवाचा सोहळा, लिम्का बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये नोंद
SHARE

मालाड पश्चिमेकडील मनोरीतील स्वामी गगनगिरी महाराज आश्रमात दरवर्षी शरद पौर्णिमेच्या मुहूर्तावर दीपोत्सव साजरा करण्यात येतो. त्यानुसार यंदाही स्वामी भक्तांनी विश्वशांतीच्या हेतूने आश्रमात १ लाख ५१ हजार दिवे उजळवले. या दीड लक्ष दीपोत्सवाची नोंद लिम्का बुक आॅफ रेकाॅर्डमध्येही करण्यात आली आहे.

या संदर्भात आश्रमचे मुख्य व्यवस्थापक निषाद अमृतराव पारणकर यांनी सांगितले की, मागील १७ वर्षांपासून आम्ही आश्रमात शरद पौर्णिमेच्या मुहूर्तावर दीपोत्सव सोहळा साजरा करत आहोत. दसऱ्यापासून शरद पौर्णिमेपर्यंत आश्रमात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.यांत प्रामुख्याने भजन-किर्तन, सत्यनारायण पूजा, पालखी मिरवणूक, आरोग्य शिबीर, छप्पन भोग, नवैद्य अर्पण सोहळा, सामुदायिक गुरूसप्तशती परायण, तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेकी इ. खेळांचाही समावेश असतो. शहर आणि उपनगरांतून या सोहळ्यासाठी भक्त आश्रमात उपस्थित राहतात.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या