Advertisement

दिवाळी शॉपिंगसाठी मुंबईतले खास मार्केट!


दिवाळी शॉपिंगसाठी मुंबईतले खास मार्केट!
SHARES

दिवाळी म्हटलं की शॉपिंग आलीच. त्यातही चांगली आणि स्वस्त खरेदी करण्याकडे सामान्यांचा कल असतो. अशीच काहीशी कल्पना डोक्यात ठेऊन मुंबईकरांची शॉपिंगसाठी लगबग सुरू आहे. त्यामुळे आम्ही अशा काही ठिकाणांची नावं सांगणार आहोत, जिथे तुम्ही शॉपिंगचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.


लिंकिंग रोड, वांद्रे    



वांद्र्यातला लिंकिंग रोड तसा प्रसिद्ध. गेली अनेक वर्ष लिकिंग रोडवर शॉपिंग करणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. ज्वेलरीपासून ते अगदी कपड्यांपर्यंत सर्व तुम्हाला इथं घेता येऊ शकतं.


नटराज मार्केट, मालाड



मालाड वेस्ट स्टेशनजवळ असलेलं नटराज मार्केट नेहमीच गजबजलेलं असतं. या नटराज मार्केटमध्ये बोरिवली, कांदिवली, गोरेगाव इथून मुंबईकर मोठ्या संख्येनं शॉपिंगसाठी येतात. घरात उपयोगी पडणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या वस्तू, रांगोळी, कंदील यासोबतच कपडे तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील.


एफएस स्ट्रीट, चर्चगेट



एफएस म्हणजेच फॅशन स्ट्रीट. कपड्यांचे प्रसिद्ध मार्केट अशी ओळख असलेल्या चर्चगेटच्या फॅशन स्ट्रीट इथं वेगवेगळ्या ठिकाणाहून मुंबईकर खरेदीसाठी येतात. इथं कपडे स्वस्त दरात मिळत असल्यानं मुंबईकरांची पहिली पसंती एफएस स्ट्रीट असते. मध्यंतरी हे मार्केट बंद होण्याच्या बातम्या आल्या होत्या. पण हे मार्केट अजूनही सुरू आहे.


दादर मार्केट



दादर मार्केट हे मुंबईतील प्रसिद्ध मार्केट आहे. फक्त कपडा मार्केट नाही, तर फुल मार्केट आणि भाजी मार्केटसाठी देखील दादर प्रसिद्ध आहे. फक्त दिवाळीच नाही, तर सर्वच सणांना आवश्यक सामान तुम्हाला या मार्केटमध्ये मिळू शकते.


अल्फा मार्केट



अंधेरीतल्या इर्ला परिसरातील अल्फा मार्केट प्रचंड मोठं आहे. या मार्केटमध्ये कंदील, कपडे आणि पणत्या असं सर्व सामान उपलब्ध आहे.



हेही वाचा

फक्त बांबूचा कंदील नव्हे, हा तर 'त्यां'च्या आयुष्यातला प्रकाश!

मुंबईतल्या दिवाळीचे खरे कलाकार धारावीत!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा