Advertisement

मुंबईच्या 'या' गणेशोत्सव मंडळाने उतरवला ३१६ कोटी रुपयांचा विमा

यंदा 'या' मंडळाचे यंदाचे 68 वे वर्ष आहे.

मुंबईच्या 'या' गणेशोत्सव मंडळाने उतरवला ३१६ कोटी रुपयांचा विमा
SHARES

मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती मंडळ अशी ख्याती असलेल्या किंग्ज सर्कल (Kings Circle) येथील जीएसबी सेवा मंडळाने (GSB Seva Mandal) यंदा तब्बल 316.40 कोटी रुपयांचा विमा उतरवत अनोखा विक्रम रचला आहे.

जीएसबी सेवा गणेश मंडळाचे यंदाचे 68 वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही पाच दिवसांचा गणेशोत्सव धार्मिक परंपरेनुसार साजरा केला जाणार आहे.

मंडळाची बाप्पाची मूर्ती 66 किलो सोन्याचे दागिने आणि 295 किलो हून अधिक चांदी व इतर मौल्यवान वस्तूनी सजवण्यात येते. यंदा जीएसबी मंडळाने विमा उतरवल्याने मुंबईत या मंडळाची जोरदार चर्चा आहे.

यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळातर्फे न्यू इंडिया इन्शूरन्स कंपनीकडून 316.40 कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे. मात्र एवढ्या मोठ्या विम्या प्रेमियमची रक्कम जाहीर करण्यास मंडळाने नकार दिला आहे.

सर्वाधिक म्हणजेच 263 कोटी रुपयांचे विमा स्वयंसेवक पुजारी स्वयंपाकी फुटवेअर स्टॉलचे कर्मचारी पार्किंग कामगार आणि कोणतीही दुर्घटना घेतल्यास सुरक्षा रक्षक यांच्यासाठी काढण्यात आला आहे. मंडप आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 20 कोटी तर मंडपाच्या आजूबाजूच्या परिसरासाठी 0.43 लाखांचा विमा उतरवला आहे.



हेही वाचा

विलेपार्लेत दहीहंडीत जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू, मदतीवरून राजकारण सुरू

लालबागच्या राजासाठी यंदा साकारणार अयोध्या

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा