Advertisement

जागर महिलाशक्तीचा : गेली 20 वर्षे 'ती' चालवते स्कूल बस


जागर महिलाशक्तीचा : गेली 20 वर्षे 'ती' चालवते स्कूल बस
SHARES

एक महिला गेल्या 20 वर्षांपासून स्कूल बस चालवते. हे ऐकल्यानंतर अनेकांना थोडे वेगळेच वाटले असेल. पण हे खरे आहे. प्रभादेवीत राहणाऱ्या प्रज्ञा प्रकाश आम्ब्रे या दादरच्या अँटोनी डिसिल्व्हा शाळेची स्कूल बस चालवतात. 1990 ला मुंबईच्या सोफिया महाविद्यालयातून 12 वी आर्ट्सचे शिक्षण घेतल्यानंतर प्रज्ञा यांनी आंतरजातीय विवाह केला. 

लग्नानंतर काही दिवस प्रज्ञा सेल्स असिस्टंट म्हणून काम करू लागल्या. याच दरम्यान त्यांनी एका मुलीला आणि मुलाला जन्म दिला. मुले जेव्हा शाळेत जाऊ लागली, तेव्हा रोज मुलांना शाळेत सोडणे आणि आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे प्रज्ञा यांनी मुलांना शाळेत सोडण्यासाठी एक मारूती व्हॅन खरेदी केली. आपल्या दोन मुलांसोबत त्या शेजारच्या मुलांनादेखील शाळेत सोडत असत. कालांतराने प्रज्ञा यांच्यासोबत बरीच मुले शाळेत येऊ लागली. तेव्हा त्यांनी एक बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई स्थित कोणत्याही महिलेला इथून पुढे नव्याने या क्षेत्रात यायचे असेल, तर मी त्या मुलींना आवर्जून मार्गदर्शन करेन. उपनगरामध्ये महिला रिक्षा चालक आहेत. याचा खूप अभिमान वाटतो. जेनिसेस हा होली बायबलमधला शब्द आहे. त्याचा अर्थच नवी सुरुवात असा असल्यामुळे मी ट्रॅव्हल्स कंपनीला ते नाव दिले आहे.

प्रज्ञा आम्ब्रे, स्कूलबस वाहनचालक


जेनिसेस ट्रॅव्हल्सची सुरुवात...

सासर आणि माहेरचा चांगला पाठिंबा लाभल्यामुळे प्रज्ञा यांनी 20 वर्षांपूर्वी आपल्या जेनिसेस ट्रॅव्हल्स कंपनीला सुरुवात केली. आता जेनिसेस ट्रॅव्हल्समध्ये 4 गाड्या आहेत. सध्या प्रज्ञा 26 सीटर गाडी चालवतात. डॉ. अँटोनी डिसिल्व्हा स्कूल, दादर आणि कॉन्व्हेंट गर्ल स्कूल, प्रभादेवी या दोन शाळांच्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्याची जबाबदारी प्रज्ञा यांच्यावर आहे. सध्या त्यांच्या 2 गाड्यांवर डायव्हर आहेत. अवघ्या 23 व्या वर्षी कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे प्रज्ञा यांनी व्यवसायाला सुरुवात केली. आज प्रज्ञा 43 वर्षांच्या आहेत. प्रज्ञा मूळच्या गोव्याच्या असून जन्मापासूनच मुंबईत वास्तव्यास आहेत.

मुलांना शाळेत सोडता सोडता ट्रॅव्हल्सच्या व्यवसायाला सुरुवात केली. मुलांचा अभ्यास घेताना मी ज्युनिअर के. जी. ते 8 वी पर्यंतच्या मुलांचे क्लास घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे सकाळी मुलांना शाळेत सोडायला आणि आणायला जाते, तर संध्याकाळी मुलांचे क्लास घेते. साधारण जॉब किंवा एसीच्या ऑफिसमध्ये बसून काम करण्यापेक्षा मी माझ्या व्यवसायात अत्यंत समाधानी आहे. सासर आणि माहेर दोन्हीकडून मला उत्तम पाठिंबा लाभला, असे प्रज्ञा सांगतात.

महिला ड्रायव्हर कमी आहेत. त्यांची संख्या वाढावी, सरकारकडून स्पेशल ट्रेनिंग असावे, महिलांसाठी नियम शिथिल असावेत म्हणजे महिला ड्रायव्हरची संख्या वाढेल, असे प्रज्ञा म्हणाल्या. त्या पुढे सांगतात, आपल्या मुलांच्या बसची चालक सुशिक्षित महिला आहे, हे जेव्हा लोकांना माहिती पडते, तेव्हा त्यांना खूपच कुतुहल वाटते.

सध्या 4 बसने वेगवेगळ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सोडण्याचे काम करत आहे. हे काम कठीण आहे, पण यामध्ये मला आनंद मिळतो. त्याचबरोबर इतरांच्या तुलनेत महिला स्कूल बस चालक असल्यामुळे मला बेस्ट चालक देखील पुढे जाऊ देतात. सकाळी मुले शाळेत जाताना गुड मॉर्निंग म्हणतात. घरी जाताना थॅंक्यू म्हणतात, यातच माझा दिवस सार्थकी लागतो.

प्रज्ञा आम्ब्रे, स्कूलबस वाहनचालक


हेही वाचा - 

जागर महिलाशक्तीचा : अन्नपूर्णा 'अक्का'

जागर महिलाशक्तीचा : धारावी झोपडपट्टीत पहिली महिला पतपेढी!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा