Advertisement

यंदा 'परी हु में नाही' तर 'घरी हुं में'

फक्त गल्लोगल्ली नाही तर मुंबई, उपनगर आणि ठाण्यातील मोठ मोठे गरबा यावर्षी रद्द करण्यात आले आहेत. जाणून घ्या मुंबई, उपनगर आणि ठाण्यातील कुठले गरबा रद्द करण्यात आले आहेत.

यंदा 'परी हु में नाही' तर 'घरी हुं में'
SHARES

रोजच्या धावपळीतून आनंदाचे चार क्षण मिळवण्यासाठी तसंच गरबा खेळण्यातून मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेसाठी नवरात्रीची तरुण मंडळी आतुरतेनं वाट पाहत असतात. या नऊ दिवसात शेकडोंच्या संख्येने भाविक मंडळांबाहेर सायंकाळच्या वेळेस खास गरबा, दांडियासाठी हजेरी लावतात. अनेक नोकरदार मंडळींचा देखील यात समावेश असतो.

मात्र यंदा राज्य शासनानं गरबा, दांडिया आयोजित न करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. त्यामुळे गल्लोगल्ली आयोजित होणारे गरबा यावर्षी रद्द करण्यात आले आहेत. फक्त गल्लोगल्ली नाही तर मुंबई, उपनगर आणि ठाण्यातील मोठ मोठे गरबा यावर्षी रद्द करण्यात आले आहेत. 

यात फाल्गुनी पाठक, गोरेगाव इथल्या नेस्कोमध्ये होणारा गरबा, द ग्रेट इंडियन दांडिया फेस्टिव्हल अशा मोठ्या आयोजकांचा यात समावेश आहे. त्यामुळे यावर्षी गरबा रसिक या आयोजकांच्या दांडिया रासला मुकणार आहेत. 

 
नवरात्री उत्सव विथ फाल्गुनी पाठकबोरीवली

गरबा-दांडिया आणि फाल्गुनी पाठक हे एक समीकरणच आहे. ‘मैने पायल है छनकाई.’, ‘चुनरी उड उड जाए.’, ‘चुडी जो खनकी हाथों में.’, ‘ओ पिया ओ पिया लेके डोलिया’, ‘सावरिया तेरे याद में’पासून अगदी गुजराती पारंपरिक गरब्याच्या गाण्यांपर्यंत फाल्गुनी पाठक गाऊ लागते तेव्हा आपोआप आपलीही पावले त्या ठेक्यावर नृत्य करू लागतात. पण कोरोनामुळे यावर्षीचा गरबा रद्द करण्यात आला आहे.

) रंगोली रे २०१९, गोरेगाव

गोरेगावमधील नेस्को मैदानदेखील गेल्या कित्येक वर्षापासून दांंडिया आणि गरबासाठी प्रसिद्ध आहे. नवरात्रीचे नऊ दिवस इथं मोठ्या प्रमाणात गरबाप्रेमींची गर्दी पाहायला मिळते. गरबा आणि दांडियाच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध पार्थिव गोहील यांच्या गाण्यांवर मंडळी थिरकायची. 

नेस्को हे इनडोअर असल्यानं इथं साधारण रात्री १ वाजेपर्यंत तुम्हाला गरब्याची मजा लुटता यायची. पण कोरोनामुळे इथला गरबा देखील रद्द करण्यात आलाय. सध्या इथं कोरोना रुग्णांसाठी COVID 19 केंद्र उभारण्यात आलं आहे. जिथे सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


द ग्रेट इंडियन दांडिया फेस्टिव्हलवांद्रे

जिओ गार्डन म्हटलं की, इथं तुम्हाला जास्तीत जास्त सेलिब्रिटीजची वर्दळ असते. वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल आणि तितकाच मोठा क्राऊड इथं गरबा खेळण्यासाठी इथं असायचा. पण कोरोनामुळे यावर्षी इथं शुकशुकाट पसरला आहे. 


श्री आझाद नगर नवरात्री महोत्सव मंडळवडाळा

पारंपरिकरित्या आणि बँडच्या आवाजावर इथं गरबा खेळला जातो. पारंपरिक वेशभूषेसह पारंपरिक गाण्यांवर आणि कच्छ बँडसह हा गरबा इथं नऊ दिवस खेळला जातो आणि हेच याचं वैशिष्ट्य आहे. पण यावर्षी इथल्या आयोजकांनी गरबा रद्द केला आहे. 


ठाणे रास रंगठाणे

ठाणे रस रंग नेहमी मोठा गरबा आयोजित करत असतात. पण कोरोनामुळे इथला गरबा देखील रद्द करण्यात आला आहे. 



हेही वाचा

navratri"="" target="_blank">Navratri Utsav 2020 : वरळीच्या भरावामुळे झाला मुंबईच्या ‘महालक्ष्मी’चा जन्म">Navratri Utsav 2020 : वरळीच्या भरावामुळे झाला मुंबईच्या ‘महालक्ष्मी’चा जन्म

Navratri 2020: नवरात्रौत्सव साधेपणानं, पण अनेकांच्या व्यवसायावर आर्थिक संकट">Navratri 2020: नवरात्रौत्सव साधेपणानं, पण अनेकांच्या व्यवसायावर आर्थिक संकट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा