ग्राहकांचा 'स्वदेशी'चा नारा, चिनी वस्तूंचा पत्ता कट


SHARE

दरवर्षी दिवाळीची शाॅपिंग म्हटले की चिनी वस्तू आपसूकच डोळ्यापुढे येतात. यंदा मात्र बाजारातून चिनी वस्तूंचा पत्ता कट झाल्याचं चित्र दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारात चिनी वस्तूंचं प्रमाण घटलं असून यंदा ग्राहकांचा कलही 'स्वदेशी' वस्तू खरेदी करण्याकडे असल्याचं विक्रेते सांगत आहेत.

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. त्यामुळे दिवाळीत कंदील, पणत्या आणि लायटींगची मागणी चांगलीच वाढते. तर रांगोळीच्या साच्यापासून इतर सजावटीच्या साहित्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. हीच मागणी लक्षात घेत चिनी वस्तू भारतीय बाजारात घुसखोरी करतात. या वस्तू भारतीय वस्तूंच्या तुलनेत अत्यंत स्वस्त असल्यानं ग्राहकही याच वस्तूंना प्राधान्य देतात. त्यामुळे घरोघरी चिनी कंदील, चिनी लायटींग, चिनी फटाके, रांगोळीचे साचे, पणत्या असा चिनी माल दिसून येतो.  पण आता ग्राहक चिनी वस्तू स्वस्त असूनही त्यांच्याकडे पाठ फिरवत आहेत.  


मागील २२ वर्षांपासून मी दिवाळीच्या दिवसांत धंदा लावतो. विशेषत: दिवाळीत मी पणत्या विक्रीसाठी ठेवतो. यंदाच्या दिवाळीचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा एकही पणती चिनी बनवटीची नाही. आमच्याकडील सर्व पणत्या धारावीतून खरेदी केलेल्या भारतीय बनावटीच्या आहेत. या पणत्यांची किंमत ३० रुपये ते ६० रूपयांदरम्यान आहे. यंदा आम्ही सर्व विक्रेत्यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. 

- उत्तम खांडेकर, विक्रेतेचिनी वस्तूंवर 'स्वयंघोषित बंदी'

मुंबईच्या बाजारपेठेत ग्राहकांनी चिनी मालावर 'स्वयंघोषित बंदी' घातली आहे. डोकलाम प्रकरणानंतर भारतीयांमध्ये चीनबद्दल प्रचंड नाराजी आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकत चीनला धडा शिकवावा, असे संदेश सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. त्याचेच रूपांतर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात झाले आहे. त्यामुळे दादर असो की क्राॅफर्ड मार्केट सर्वत्र चिनी वस्तू कमी प्रमाणात दिसत आहेत.


विणलेले कंदील आकर्षण

यंदा दिवाळीत भारतीय बनावटीचे लोकरी कंदील, कागदी कंदील ग्राहकांचे आकर्षण ठरत आहेत. हे कंदील हाताने विणलेले असून ते मजबूत आहेत. किंमतीने महाग असले तरीही ग्राहकांना आवडतील असे हे कंदील आहेत. या कंदीलाची किंमत १ हजार रुपयांपासून पुढे आहे. 


तोरणांना विशेष मागणी

दादरच्या बाजारात पूर्वी चिनी लाईटच्या तोरणांना विशेष असायची. परंतु यंदा भारतीय बनावटीच्या तोरणांना विशेष मागणी असल्याचे दिसत आहे. या तोरणाची किंमत २५० रुपयांपासून सुरू होते.   


दिवाळीत गिफ्ट देण्यासाठी भारतीय बनावटीचे चॉकलेट ५० ते ३५० रुपयापर्यंत उपलब्ध आहेत. फराब चॉकलेटपासून इलेक्ट्रीक पणत्यांपर्यंत सर्व विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू भारतीय बनावटीच्या आहेत. ग्राहक होममेड चॉकलेट्सला विशेष पसंती देत आहेत. यंदा दुकानात एकही चिनी  वस्तू विक्रीसाठी ठेवलेली नाही.
-मालक, दादर सुपरमार्केटडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

संबंधित विषय