Advertisement

दिव्यांगांनी घडवली बाप्पांची अद्भूत मूर्ती!


दिव्यांगांनी घडवली बाप्पांची अद्भूत मूर्ती!
SHARES

आजपर्यंत आपण मूर्तीकार बाप्पाची सुबक मूर्ती बनवत असल्याचे ऐकले असाल. पण महालक्ष्मीतील आनंद निकेतन या आश्रमात प्रतिष्ठापित करण्यात आलेली बाप्पाची मूर्ती ही तिथल्याच वृद्ध, अनाथ सदस्यांच्या मदतीने एका दिव्यांग तरुणाने साकारली आहे.


वसंत सोलंकी असे या तरुणाचे नाव असून तो दोन्ही पायांनी अधू आहे. गेल्या आठ वर्षांपासून वसंत आनंद निकेतन आश्रमात राहत आहे. आनंद निकेतन आता त्याच्यासाठी घरच झाले आहे! येथील दिव्यांग आणि वृद्धांना स्वतःहून बाहेर पडता येत नाही, सार्वजनिक ठिकाणी ते गर्दीत जाऊ शकत नाही. म्हणून वसंतला आपल्या आश्रमरुपी घरी गणेशोत्सव साजरा करावा आणि त्याचा आनंद येथील आपल्या सर्व कुटुंबियांना द्यावा, असे वाटले. नंतर त्याने ही कल्पना आश्रमाच्या अधीक्षक प्रणाली लाड यांच्यासमोर मांडली. प्रणाली यांनीही वसंतला परवानगी दिली.


वसंतने शाडूच्या मातीपासून सुरेख अशी गणपतीची मूर्ती साकारली आहे. तर त्याच आश्रमात राहणाऱ्या सुनील जाधव याने पूजेला लागणारे रोजचे हार, तसेच फुलांचे डेकोरेशन स्वतःहून केले, अमोल तसेच दिनेश गावडा, सुधीर रेगे, रमेश, जेम्स, विमल आणि लीला यांनीदेखील विविध कामात मदत केली. शारीरिक अपंगत्व आलेली ही मंडळी मनाने मात्र सक्षम आहेत, हेच त्यांनी यातून दाखवून दिले आहे. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण! याचा; प्रत्यय ते आणून देत आहेत.



हे  देखील वाचा - 

नालासोपाऱ्यात लहानग्यांचा गणेशोत्सव ठरतोय 'एकतेचं' प्रतिक

पीओपी आणि शाडूनंतर आता एलईडी गणेशमूर्ती!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा