Advertisement

बाप्पाही म्हणतोय... वाचाल तर वाचाल, दादरच्या मंडळाची हटके सजावट

विद्या ददाति विनयम् असा संदेशही याद्वारे देण्यात आला आहे.

बाप्पाही म्हणतोय... वाचाल तर वाचाल, दादरच्या मंडळाची हटके सजावट
SHARES

दोन वर्षांनंतर गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. घरो-घरी तर उत्साह पाहायला मिळतच आहे. पण यंदा सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समाज प्रबोधनाचे संदेश देणारे देखावे सादर करतात. अशापैकीच एक आहे दादर इथला राधाकृष्ण निवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.

गणपती हे बृद्धीचे दैवत मानले जाते. त्यामुळे यावर्षी मंडळाच्या वतीने पर्यावरण स्नेही आणि लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हे उद्दिष्ट नजरे समोर ठेऊन ग्रंथालय या संकल्पनेवर सजावट साकारण्यात आली आहे.


विद्या ददाति विनयम् असा संदेशही याद्वारे देण्यात आला आहे. विद्या ददाति विनयम्, म्हणजेच ज्ञान आणि विद्यामुळे माणसामध्ये नम्रता येते. विद्या किंवा ज्ञान मिळवण्याचा एकच मार्ग म्हणजे पुस्तके. ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तकांचं हेच महत्त्व मंडळाने देखाव्यातून सादर केला आहे.

विशेष म्हणजे सजावटीसाठी वापरण्यात आलेली पुस्तके ही मंडळाला वर्गणीदार आणि वाचकांकडून भेट म्हणून  देण्यात आली आहेत. जवळपास 300 हून अधिक वेगवेगळ्या विषयांवर आधारीत पुस्तकांचा खजिना मंडळाला वाचकांकडून भेट म्हणून दिला आहे.

लायब्ररी ही संकल्पना ऋषीकेश बाणावलकर यांची आहे. तर ही संपूर्ण सजावट सुश्मिता चंद्रमौली यांनी केली आहे. कॅलिग्राफी सोनाली माने आणि लायटिंग उमेश काटे आणि अक्षय मोरे यांनी केली आहे.

वाचकांकडून भेट म्हणून मिळालेली ही 300 पुस्तके गणेशोत्सवानंतर NGO Book Share Of India या सेवाभावी संस्थेला सुपूर्द करण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजसेवा हे धोरण राबवून ही पुस्तकं संस्थेला दिली जाणार आहेत, अशी माहिती राधाकृष्ण निवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अभय चव्हाण यांनी दिली.



हेही वाचा

75 हजार मातीच्या पणत्यांपासून साकारला विघ्नहर्ता

गणेशभक्तांसाठी खूशखबर! यंदा लालबागच्या गणपतीचा ऑनलाईन मिळणार प्रसाद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा