Advertisement

राख्यांनी फुलली बाजारपेठ


राख्यांनी फुलली बाजारपेठ
SHARES

भावा-बहिणीचं नातं अतूट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन येत्या रविवारी असल्यामुळं लाडक्या भावाच्या पसंतीस उतरेल, अशी राखी घेण्यासाठी दादरमध्ये महिलांनी गर्दी केली आहे.  दादरमध्ये ठिकठिकाणी राख्यांची दुकानं थाटण्यात आली आहेत.


सॅटिन रिबीनच्या राख्या

रेशीम धाग्याचा वापर करून तयार केलेल्या राख्यांचा मोठ्या प्रमाणात भाव वाढला आहे. तसंच सॅटिन रिबीनपासून बनवलेल्या, तुळशीचे मणी आणि रूद्राक्षाचा वापर करून तयार केलेल्या राख्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. या राख्यांची किंमत २० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत आहे.


ऑनलाईनही विक्री

अॅमेझाॅन, फ्लिपकार्ट अादी ऑनलाईन साईटवर राख्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. अॅक्रेलिक सोनेरी रंगाच्या अाणि कोरीव शब्द असलेल्या राख्याही विक्रीसाठी आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या गणपतीच्या आकारात कोरीव काम केलेल्या राख्यादेखील ऑनलाईन साईटवर उपलब्ध आहेत. या राख्यांची किंमत ५० रुपयांपासून ४ हजार रुपयांपर्यंत आहे.

 
कार्टुन्सच्या राख्या

लहान मुलांसाठी आकर्षक कार्टुंनच्या राख्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. स्पायडरमॅन, मिकीमाऊस, डोरेमॉन, बाल गणेश, अँग्रीबर्डस्, बेन टेन, छोटा भीम अादी विविध कार्टुनच्या राख्या बाजारात विक्रीसाठा आल्या आहेत. या राख्यांची किंमत २० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत आहे.  



हेही वाचा -

भावाला राखी पाठवण्यासाठी बहिणींची पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी

संकल्पची दहीहंडी यंदाही नाही!




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा