Advertisement

संकल्पची दहीहंडी यंदाही नाही!

न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारनं परिपत्रक काढत दहीहंडी खेळाचा साहसी खेळात समावेश करणं गरजेचं आहे. पण अद्यापपर्यंत राज्य सरकारनं असं परिपत्रकच काढलेलं नाही. त्यामुळे पोलिसांकडून आयोजकांना नोटीसा बजावल्या जातात. तर याचिकाकर्ते आयोजकांना न्यायालयात ओढतात असं म्हणत अहिर यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.

संकल्पची दहीहंडी यंदाही नाही!
SHARES

दहीहंडी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मुंबई, ठाण्यातील विविध मंडळांची दहीहंडी त्यातही राजकीय नेत्यांची दहीहंडी म्हटली की, संकल्प, संघर्ष, संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी अशी नावं चटकन डोळ्यासमोर येतात. पण न्यायालयाने दहिहंडीवरील निर्बंध हटवूनही संकल्प दहीहंडीचे आयोजक सचिन अहिर यांनी यंदा देखील दहीहंडी उत्सवातून माघार घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. दहीहंडीचा साहसी खेळात समावेश करणारं परिपत्रक राज्य सरकारने न काढल्याने हा निर्णय घेतल्याचं अहिर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं.


अायोजनात चढाओढ

दहीहंडी आणि राजकीय नेते हे गेल्या काही वर्षात एक समीकरणचं बनलं आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत राजकीय नेत्यांमध्ये दहीहंडीच्या आयोजनात चढाओढ दिसून येत असून त्यातूनच लाखोंच्या दहीहंड्या लावल्या जात आहेत. त्यामुळे दहीहंडी हा उत्सव न राहता त्याचं इव्हेंटमध्ये रुपांतर  झालं आहे.


थरांच्या वादाचा फटका

 तर दुसरीकडे दहीहंडी खेळावरून, त्यातील थरावरून वाद रंगला आहे. त्यातच राज्य सरकारकडून दहीहंडीचा समावेश साहसी खेळात करण्यासंबंधीचं परिपत्रक काढलं जात नसल्याने दहीहंडी आयोजक नाराज आहेत. थरांच्या वादाचा फटका बसण्याची शक्यता असल्यानेच अहिर यांच्या संकल्प आणि जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील संघर्ष प्रतिष्ठानने दहीहंडी उत्सवाचं गेल्या वर्षी आयोजन केलं नव्हतं.


निर्बंध दूर पण...

दहीहंडी उत्सवातील थरांचा मुद्दा न्यायालयापर्यंत गेल्याने आयोजकांपुढे सगळ्यात पहिल्यांदा आडकाठी आली होती. दरम्यान न्यायालयानं दहीहंडी उत्सवावरील निर्बंध काढल्याने आयोजकांना थोडाफार दिलासा मिळाला. परंतु प्रत्यक्षात दहीहंडी आयोजनातील अडथळे दूर झालं नसल्याचं अहिर यांचं म्हणणं आहे.


परिपत्रक कुठंय?

न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारनं परिपत्रक काढत दहीहंडी खेळाचा साहसी खेळात समावेश करणं गरजेचं आहे. क्रीडामंत्र्यांनी गेल्या वर्षी दहीहंडी खेळाचं साहसी खेळामध्ये समावेश करण्यासंबंधीचं परिपत्रक काढण्यात येईल, असं जाहीर केलं होतं. पण दहीहंडी उत्सव तोंडावर आला तरी अद्याप राज्य सरकारनं असं परिपत्रकच काढलेलं नाही. त्यामुळे पोलिसांकडून आयोजकांना नोटीसा बजावल्या जातात. तर याचिकाकर्ते आयोजकांना न्यायालयात ओढतात, असं म्हणत अहिर यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.


राष्ट्रवादीची दहीहंडी होणार

याच पार्श्वभूमीवर यंदा वरळीतील सर्वात मोठी आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली संकल्पची दहीहंडी होणार नसल्याचं अहिर यांनी जाहीर केलं आहे. तर संकल्पची दहीहंडी होणार नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

उत्सवाचं बाजारीकरण थांबवा - राज ठाकरे

अंध गोविंदा दहीहंडीसाठी थर लावतात तेव्हा...

गोविंदांचा विमा १० लाखांचा!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा