Advertisement

...म्हणून मुंबईतल्या या दहीहंडी ठरल्या विशेष!


SHARES

स्वातंत्र दिन आणि गोकुळाष्टमी यांचा एकत्रित योग जुळून आल्याने यंदा देशभरातील नागरिकांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. एकीकडे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. तर दुसरीकडे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने गोविंदा पथकांमध्ये दहीहंडी फोडण्याची स्पर्धा लागली होती. पण करीरोड आणि मालाडमधील हे दोन्ही उत्सव अगदी लक्ष वेधण्यासारखे होते.


करीरोड नवशक्ती सेवा मंडळ

यंदा 15 ऑगस्ट रोजी म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच दहीहंडीचा उत्सव असल्याने अनेक ठिकाणी ध्वजारोहण केल्यानंतर दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. पण करीरोडमध्ये मात्र ध्वजारोहण आणि दहीहंडी हे दोन्ही कार्यक्रम अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे झाले.

नवशक्ती मंडळाने ध्वजारोहण करण्यासाठी भारतीय सेना दलाच्या निवृत्त जवानांना बोलावले होते. ध्वजारोहणानंतर येथे 6 थरांचा मानवी मनोरा रचून गोविंदांनी ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी लहानग्यांनीही आवर्जून सहभाग नोंदवला होता.

70 वर्षांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सीमा रेषेवर भारताचे रक्षण करण्याकरता वेळप्रसंगी प्राणांची पर्वा न करणाऱ्या भारतीय जवानांचा जाहीर सत्कार करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले होते.

निलेश शिंदे, अध्यक्ष, नवशक्ती सेवा मंडळ, करीरोड


दहीहंडीत अवतरला स्पायडरमॅन

मुंबईतील स्पायडर मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौरव शर्मा याने गोकुळाष्टमी आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने क्लाईंबिंग करत मलाड, एव्हरशाईननगर येथील ब्रिंदावन इमारत चढून दहीहंडी फोडत झेंडा फडकवला. गौरवचे हे थरारक स्टंट पाहण्यासाठी यावेळी मोठी गर्दी जमली होती.

26 ऑगस्ट 2009 साली गौरवने भारतातील सर्वात उंच इमारत सर करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. दक्षिण मुंबईतील नाना चौक येथील श्रीपती अॉर्केड इमारत सर करून एक नवा विक्रम त्याने केला आहे. ती इमारत त्याने 19 मि. 4 सेंकदांत सर केली होती. 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली म्हणून 26 नोव्हेंबर 2009 रोजी त्याने नाना चौकातील इमारत सर करुन भारताचा झेंडा फडकवला होता. आता 15 ऑगस्ट रोजी 100 फूट उंचीच्या इमारतीवर केलेल्या क्लाईंबिंगची देखील विश्व विक्रमात नोंद करणार असल्याचे आयोजक नेवडा पुटमॅन यांनी सांगितले.

जगातील सर्वांत उंच इमारत म्हणून ओळख असलेली बुर्ज खलिफा ही इमारत सर करण्याचा मानस आहे. याआधी ती इमारत एकाने सहा तासात सर केली आहे. पण मी तीन तासांत ती सर करणार आहे.

गौरव शर्मा, क्लाईंबर
हेही वाचा - 

117 गोविंदा जखमी, दोघांचा मृत्यू

गेट वे ऑफ इंडियावर दिसणार मुंबईचा इतिहास!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा