Advertisement

अंध गोविंदा दहीहंडीसाठी थर लावतात तेव्हा...


अंध गोविंदा दहीहंडीसाठी थर लावतात तेव्हा...
SHARES

थरावर थर लावणारे गोविंदा बघितले की बघणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. पण हे थर लावणारे गोविंदा जर अंध असतील तर? होय..आणि हे करुन दाखवलंय नयन फाऊंडेशनच्या गोविंदा पथकानं. आणि फक्त मुलंच नव्हे, तर अंध मुलींनीही दहीहंडीसाठी थर लावून हम भी किसी से कम नहीं हे दाखवून दिलं.

गेल्या चार वर्षांपासून नयन फाऊंडेशन या अंध मुलांना घेऊन दहीहंडीचे थर लावत आहे. पण त्यापेक्षाही ही मुलं ज्या जिद्दीने दरवर्षी थर लावून दहीहंडीचा आनंद लुटतात, ती जिद्द डोळसांनाही तोंडात बोटं घालायला लावणारी असते.

लालबाग, दादर, परळ आणि शेवटी ठाणे अशा प्रत्येक ठिकाणी या गोविंदा पथकाचा उत्साह दिसून आला. प्रत्येक ठिकाणी 4 थर लावत या पथकांनी उपस्थितांची मनं जिंकली. पण त्याच वेळी समोर या अंध गोविंदांना थर लावताना पाहून बघणाऱ्यांच्या काळजात धस्स होत होतं. पण हे गोविंदा मात्र अगदी सराईतपणे थर लावत होते.

या गोविंदांचं हे कसब वाखाणण्याजोगं होतं. त्यांना उपस्थितांची तशीच दादही मिळत होती. मात्र थर लावून झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच त्यांच्या भावना व्यक्त करणारा होता.



हेही वाचा - 

117 गोविंदा जखमी, दोघांचा मृत्यू

यांच्या उत्साहाला तोड नाही!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा