माहिममध्ये स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

 Mahim Railway Station
माहिममध्ये स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
माहिममध्ये स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
माहिममध्ये स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
माहिममध्ये स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
See all

माहिम - रामकृष्ण मिशन मठ यांच्यावतीने माहिम कॉजवे मार्गावरील स्वामी विवेकानंद मठात स्वामी विवेकानंद यांचा 154 वा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पालिका उपआयुक्त आनंद वागराळकर यांच्यासह रामकृष्ण मिशन मठाचे अनेक पदाधिकारी आणि सेंट स्टॅनिस्लाऊज हायस्कुलचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी स्वामी विवेकानंदांच्या भाषणावर आधारीत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 150 शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये स्क्वेअर अकॅडमी शाळेतील नववीमध्ये शिकणाऱ्या विधी यादवने प्रथम क्रमांक, जमनाबाई नरसी शाळेतील तनिषा पेठे हिने द्वितीय तर चिर्ल्डन अकॅडमीच्या पार्थ गेडियाने तिसरा क्रमांक पटकावला. यावेळी उपआयुक्त आनंद वागराळकर यांनी स्वामींनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचा प्रेरणादायी आढावा घेतला.

Loading Comments