Advertisement

आरेत 'वृक्षा'बंधन साजरा


आरेत 'वृक्षा'बंधन साजरा
SHARES

मुंबईसह देशभर रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. बहिणीचं आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन या दिवशी प्रत्येक भाऊ बहिणीला देतो. हेच वचन शनिवारी पर्यावरणप्रेमींनी आरे जंगलातील हजारो झाडांना दिलं. ''आरेतील झाडाचं सदैव रक्षण करू'', असं म्हणत पर्यावरणप्रेमी, अारेतील आदिवासी बांधव आणि शालेय विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधली.


विकासाच्या नावाखाली कत्तल

पर्यावरणाच्या दृष्टीने झाडाचं किती मोठं महत्त्व आणि स्थान आहे हे काय कुणी कुणाला सांगायला नको. झाडं जगली तरच आपण जगू. पण गेल्या काही वर्षांत विकासाच्या नावाखाली झाडांची बेसुमार कत्तल केली जात आहे. मुंबईतील झाडांची संख्या घटत चालली आहे. त्याचा परिणाम पर्यावरणातील बदलाच्या रूपाने दिसत आहे.



मेट्रो ३ साठी कुऱ्हाड

असं असताना मुंबईच फुप्फुस म्हणून ओळखलं जाणाऱ्या आरे जंगलावर मेट्रो ३ च्या कामासाठी कुऱ्हाड चालवली जाणार आहे. असं झाल्यास त्याचा मोठा परिणाम मुंबई च्या पर्यावरणावर होईल, असं म्हणत वनशक्ती, सेव्ह आरे, सेव्ह ट्री आणि आरेतील आदिवासी बांधवांनी याला जोरदार विरोध केला आहे.



रक्षणाची जबाबदारी

यासाठी ते न्यायालयीन लढाई बरोबरच रस्त्यावरचही लढाई लढत आहेत. अारेतीलच नव्हे, तर मुंबईतील प्रत्येक झाडाचं रक्षण करण्याची जबाबदारी पर्यावरणप्रेमींनी स्वीकारली आहे. त्यामुळेच शनिवारी आरेत 'वृक्षाबंधन' साजरा करण्यात आल्याची माहिती पर्यावरणप्रेमी अमृता भट्टाचार्य यांनी 'मुंबई लाइव्ह' दिली.


कधी झाला कार्यक्रम?

शनिवारी सकाळी ८ वाजता मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी, आदिवासी बांधव आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत आरेतील झाडांना राखी बांधली. आयुष्यभर झाडाचं रक्षण करण्याच वचन दिल्याचंही अमृता यांनी सांगितलं. तर आरे बरोबरच सेव्ह आरे आणि सेव्ह ट्री च्या सदस्यांनी आपापल्या परिसरात, सोसायटीतही वृक्षाबंधन साजरा केल्याचंही अमृताने सांगितलं. पर्यावरणप्रेमींच्या या आगळ्यावेगळ्या रक्षाबंधन उल्लेखनीय म्हणावं लागेल.



हेही वाचा-

एसटीला राखी बांधून कर्मचाऱ्यांनी स्वीकारली तिच्या संरक्षणाची जबाबदारी

भावाला राखी पाठवण्यासाठी बहिणींची पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा