Advertisement

एसटी बसला राखी बांधून कर्मचाऱ्यांनी स्वीकारली संरक्षणाची जबाबदारी


एसटी बसला राखी बांधून कर्मचाऱ्यांनी स्वीकारली संरक्षणाची जबाबदारी
SHARES

एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल आगारात रविवारी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. आगारातील महिला कर्मचाऱ्यांनी पुरुष कर्मचाऱ्यांना राखी बांधून सण साजरा केला. तर सर्व कर्मचाऱ्यांनी एसटीला राखी बांधून तिचं संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली.



परिवहन मंत्र्यांची संकल्पना

पोलिसांप्रमाणेच सतत प्रवाशांच्या सेवेत असणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक सणाला कामासाठी हजर राहावं लागतं. त्यामुळं एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सण उत्सव साजरे करता येत नाहीत. याची उणीव यावेळी कर्मचाऱ्यांना होऊ नये यासाठी, परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ही संकल्पना आखली होती. या संकल्पनेतंर्गत मुंबई सेंट्रल आगारातील महिला कर्मचाऱ्यांनी पुरुष कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.



रक्षणाची जबाबदारी

राज्यात कुठलंही आंदोलन, प्रदर्शन वा बंद असला की सर्वात पहिल्यांदा एसटीच्या बसला लक्ष्य करून तिची तोडफोड करण्यात येते. यामुळे आधीच तोट्यात असलेल्या महामंडळाला आणखी नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळे या बसच्या संरक्षाची जबाबदारी स्वीकारून कर्मचाऱ्यांनी रक्षाबंधाच्या निमित्ताने आपलं औदार्य दाखवून दिलं.


जादा एसटी बस गाड्या

रक्षाबंधनानिमित्त प्रवाशांची गैरसोय होऊ नयो यासाठी शनिवारी आणि रविवारी जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. २ महाड, ११ स्वारगेट, २ कराड, ६ सातारा अशाप्रकारे जादा गाड्या मुंबई सेंट्रल आगारातून सोडण्यात आल्या आहेत.



हेही वाचा-

मुंबई ते दिल्ली फक्त १२ तासांमध्ये!

रक्षाबंधननिमित्त रविवारचा मेगाब्लॉक रद्द



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा