Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

मुंबईत वसलेलं 'पंढरपूर'

मुंबईतील विठ्ठल मंदिरांमध्येही आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जाते. टाळ मृदुंगाचा गजर आणि 'ग्यानबा तुकाराम'च्या जयघोषात तल्लीन वारकरी हेच दृश्य मुंबईतल्या मंदिरांमध्येही पहायला मिळतं. मुंबईतल्या अशाच काही मंदिरांचा घेतलेला हा आढावा.

मुंबईत वसलेलं 'पंढरपूर'
SHARES

बोलावा विठ्ठल || पाहावा विठ्ठल || आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती पंढरपूरची वारी. आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्याच्या ओढीने सारे वारकरी पंढरीची वाट चालतात. टाळ-मृदुंगच्या ठेक्यावर 'ग्यानबा-तुकाराम'च्या जयघोषात या विठुरायाचे नामस्मरण करण्यात वारकरी लीन होतात.

पण प्रत्येकालाच वारीला जाण्याची संधी मिळतेच असं नाही. मुंबईतही असे अनेक भाविक आहेत, ज्यांना विठुरायाच्या दर्शनाला जायचे आहे. पण काही कारणास्तव त्यांची वारी चुकली. अशावेळी हे भक्त मुंबईतच वसलेल्या विठूरायाचे दर्शन घेतात. मुंबईतील विठ्ठल मंदिरांमध्येही आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जाते. टाळ मृदुंगाचा गजर आणि 'ग्यानबा तुकाराम'च्या जयघोषात तल्लीन वारकरी हेच दृश्य मुंबईतल्या मंदिरांमध्येही पहायला मिळतं. मुंबईतल्या अशाच काही मंदिरांचा घेतलेला हा आढावा.


१) विठ्ठल रखुमाई मंदिरवडाळा

वडाळ्याची जुनी ओळख म्हणजे ४०० वर्षांपूर्वीचे विठ्ठल मंदिर. 'प्रतिपंढरपूर' या नावानंही हे मंदिर ओळखलं जातं. पूर्वी मुंबई ही सात बेटांची होती. त्यातलंच वडाळा हे एक बेट किंवा गाव होतं. वडाळा प्रसिद्ध होतं ते तिथल्या मिठागरांसाठी. इथे राहणारे बहुतेक व्यापारी मिठाचा व्यापार करत. इथले व्यापारी हे विठ्ठलाचे आणि तुकारामांचे भक्त होते.

एक दिवस काम करताना या मिठागरात काम करणाऱ्यांना विठ्ठल-रखुमाईची मूर्ती सापडली. सदर घटना व्यापाऱ्यांनी पंढरपूरला जाऊन तुकाराम महाराजांना सांगितली. या मूर्ती ज्या ठिकाणी सापडल्या तिथे विठ्ठल रखुमाई मंदिर स्थापन करण्यास तुकाराम महाराजांनीच सांगितल्याचं बोललं जातं. व्यापाऱ्यांनी एका तळ्यात भरणा टाकून विठ्ठल रखुमाईचं मंदिर स्थापन केलं.

या भागाचा जसजसा विकास होत गेला, तसतसा मंदिराचा विस्तार वाढत गेला. तेव्हापासून मुंबईतल्या भाविकांना पंढरपूरला जाणं शक्य नसल्यास भाविक वडाळ्याच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात.


मंदिरात पहाटे काकड आरती, दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता आरती तर रात्री ९.३० वाजता शेजारती होते. दशमीपासून भजन सुरू होऊन ते आषाढी एकादशीच्या रात्रीपर्यंत सुरू असतं. विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीला लाखो भाविकांची गर्दी असते. आषाढीला एक दिवसीय मेळा देखील भरतो.

पत्ता - वडाळा बस डेपोजवळ, सेंट्रल रेल्वे कॉलनी, कात्रक रोड, वडाळा (पूर्व)

२) विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टसायन

सायन इथलं १२५ वर्ष जुनं श्री विठ्ठल रखुमाई मंदिर १८९३ साली स्थापन करण्यात आलं होतं. श्रीधर दामोदर खरे महाराज हे १८६० साली मुंबईत आले आणि शिवगावात स्थायिक झाले. एकदा दामोदर खरे पंढरपूरला वारीला गेले होते. तिकडचा सोहळा पाहून ते प्रभावित झाले. पंढरपूरहून येताना त्यांनी घरी देवपूजेसाठी धातूच्या मूर्ती आणल्या होत्या. पण त्या धातूच्या मुर्ती चोरीला गेल्या. मूर्ती चोरीला जाऊ नयेत म्हणून त्यांनी विठ्ठल रखुमाईच्या पाषाण मुर्ती घरी ठेवल्या.

त्यावेळी शेवगावात कोळी, आग्री लोकं राहत होते. या लोकांनी मूर्ती मंदिरात स्थापन करावी अशी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार खरे यांनी मूर्तीची स्थापना मंदिरात केली. एवढंच नव्हे, तर पंढरपूर इथल्या रखुमाई मंदिरात पूजा करणारे पंढरीनाथ उत्पात यांना मुंबईत आणले आणि पूजेची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. मंदिराचा कारभार पाहण्यासाठी ट्रस्ट नेमण्यात आलं. त्याची जबाबदारी वासुदेव बळवंत सोमण यांच्यावर सोपवण्यात आली.

या मंदिराची आणखी एक खासियत म्हणजे, सणानुसार विठ्ठल रखुमाईची वेशभूषा बदलली जाते. वसंत ऋतूमध्ये मूर्तीला चंदनाचा लेप लावून कृष्ण, नरसिंह अशी अनेक रुपं दिली जातात. दिवाळी, नवरात्र अशा सणासुदीला मूर्तीला अलंकारांनी सजवलं जातं. आषाढी एकादशीच्या दिवशीही मंदिराची सजावट केली जाते. दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते.

पत्ता -आशिर्वाद अपार्टमेंट, लक्ष्मीबाई केळकर मार्ग, सायन मेन रोड, सायन फ्लायओव्हर जवळ, सायन(पश्चिम)

३) श्री विठ्ठल रखुमाई मंदिरमाहीम

माहीमचं विठ्ठल रखुमाई मंदिर ९६ वर्ष जुनं असून १९१६ साली ते बांधण्यात आलंत्यावेळी माहीम हे बेट होते१९१४-१५ साली माहीममध्ये प्लेगची साथ पसरली होतीप्लेगपासून बचाव व्हावा आणि यावर काही तरी उपाय सापडावा म्हणून परिसरातील रहिवासी एका भगताकडे गेले होते अशी आख्यायिका आहे

या भगताने बेटावर विठ्ठल रखुमाई मंदिर उभारण्यास सांगितलेत्यानुसार रहिवाशांनी पंढरपूरला जाऊन विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणली आणि मंदिराची उभारणी केलीतेव्हापासून प्लेगची साथ नष्ट झाल्याचा दावा परिसरातील रहिवासी करतात.

मंदिरात प्रवेश केल्यावर गणेशाची आणि गरुडाची मूर्ती नजरेस पडतेमंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात काळ्या पाषाणातील विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहेआषाढी एकादशीला सांस्कृतिक आणि भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातातआषाढी एकादशीला मंदिरात प्रचंड गर्दी दिसून येते.

पत्ता - विठ्ठल रखुमाई मंदिर, मोरी रोड पोस्ट ऑफिसच्या समोर, माहीम फाटक


४) विठ्ठल रखुमाई मंदिरविलेपार्ले

विलेपार्ले इथलं हे मंदिर ८१ वर्ष जुनं असून ८ फेब्रुवारी १९३५ साली बांधण्यात आलं. हे मंदिर लक्ष्मीदास गोकुळदास तेजपाल यांनी त्यांच्या मुलीच्या जन्मदिनानिमित्त बांधलं. संपूर्ण मंदिर संगमरवरी असून ते पश्चिमाभिमुख आहे. मंदिराची पूर्ण व्यवस्था विठोबा टेम्पल ट्रस्टतर्फे पाहिली जाते.


मंदिरात प्रवेश करताच मंदिराची थोडक्यात माहिती देणारा शिलालेख नजरेस पडतोमंदिरातील विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती या काळ्या पाषाणातल्या आहेततसंच मंदिरात तुकारामसंत ज्ञानेश्वर आणि विठ्ठलाचे फोटो आहेतआषाढी एकादशीला इथे पूजा आणि वेशभूषा केली जाते

पत्ता - तेजपाल स्कीम रोड, विले पार्ले (पूर्व)


५) विठ्ठल रखुमाई मंदिरवांद्रे

हे मंदिर ७३ वर्ष जुनं असून ९ जानेवारी १९४० साली मंदिरात विठ्ठल-रखुमाई मूर्तीची स्थापना करण्यात आलीसंत सेना नाभिक समाजानं ही वास्तू उभारलीसंत सेना महाराजांच्या पुण्यतिथीवेळी बाळाभाऊ तुपे यांनी विठ्ठल मंदिराची कल्पना मांडली होती

मंदिर उभारण्यासाठी अनेकांनी आर्थिक मदत केली आहे१९९० साली मंदिराचा सुवर्णमहोत्सव झालापाच-सहा वर्षांपूर्वीच करवीर पिठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते मंदिरावर दोन किलो सोन्याचा कळस चढवण्यात आला.

आषाढी एकादशीला मुंबईतल्या अनेक दिंड्या या मंदिरात दाखल होतात.

पत्ता - जरीमरी रोड, महात्मा सेवा मंदिर जवळ, गांधी नगर, वांद्रे (पश्चिम)

६) विठ्ठल रखुमाई मंदिरभायखळा

हे पुरातन मंदिर असून १२४ वर्षांपूर्वी मंंदिराची स्थापना करण्यात आलीमंदिरात ४१३ अखंड हरिनाम सप्ताह झाले आहेततर ६ हजार ५२ किर्तनकारांचे किर्तन झाले आहे.

मंदिरात सकाळी १० ते १२ महिला भजन,  दुपारी १ ते ४ पोथीवाचनसंध्याकाळी ६ ते ७ महिला हरिपाठ आणि त्यानंतर आरती होते

पत्ता - विठ्ठल मंदिर, एन. एम. जोशी मार्ग, भायखळा (पश्चिम)

७) विठ्ठल रखुमाई मंदिरबोरीवली

हे मंदिर ३३ वर्ष जुनं असून १९८० साली याची स्थापना झालीया मंदिराच्या इतिहासाबद्दल एक कथा आहेविठ्ठलभक्त उत्तेकर यांना खुद्द विठुरायानं स्वप्नात येऊन अनुग्रह दिलाया साक्षात्कारानंतर त्यांनी मंदिराच्या ठिकाणी विठ्ठल रखुमाई मूर्तीची स्थापना केलीस्थानिक विठ्ठल भाविकांनी त्यांना मंदिर उभारण्यास हातभार लावला.

२००१ साली या मंदिराचा जीर्णोद्धार झालाआषाढी एकादशी निमित्त मंदिरात ३ दिवस उत्सव साजरा केलाया महोत्सवात किर्तनकारांचे किर्तन आयोजित केले जातेमंदिरात सकाळी ४ वाजता काकड आरतीसायंकाळी ३ ते ५ वाजता महिला मंडळांचे भजन आणि ७ ते ८ वाजता विठ्ठलाची शेजारती होतेमंदिरातील विठ्ठल रखुमाईची मूर्ती ही नवसाला पावणारी आहेअसा भाविकांचा समज आहे.

पत्ता - श्री विठ्ठल नगर रोड, देवीपाडा, बोरीवली (पूर्व)
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा