• घाटकोपरमध्ये शिवरथ यात्रा
SHARE

घाटकोपर - शिवाजी महाराजांची तिथीनुसार शिवजयंती मुंबईमध्ये साजरी करण्यात आली. ढोल ताशांच्या गजराने घाटकोपरमधील वातावरण जणू शिवमय झाले होते. या वेळी तरुण-तरुणींमधील उत्साह देखील ओसंडून वाहत होता. पारंपरिक वेशात आलेल्या या तरुण-तरुणींनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. घाटकोपरमध्ये शिवजंयती निमित्त 'शिवरथ यात्रा' आयोजित करण्यात आली होती. 38 वर्ष जुनी परंपरा असलेल्या या यात्रेत शिवज्योत देखील आणण्यात आली. 11 वाजता सुरू झालेल्या या यात्रेत घाटकोपरमधील प्रत्येक व्यक्तीने सहभाग घेतला होता. भगवे फेटे, पारंपरिक वेशभूषा यामुळे जणूकाही घाटकोपमध्ये शिवशाही अवतरल्याचा भास होत होता.

संबंधित विषय
ताज्या बातम्या