मागितले पैसे मिळाला मार

 Borivali
मागितले पैसे मिळाला मार

बोरीवली - पैसे मागितल्याने एका दुकानदारास मारल्याची घटना बोरीवलीच्या टाटा पावर हाऊस त्रिमूर्ती पाटील कंपाऊंडमध्ये घडली. रमेश गवळी असं आरोपीचं नाव असून, तो आणि त्याचे साथीदार फरार आहेत. पोलिसांनी तिघा आरोपींवर कलम ३२६,३२४,५०४,५०६,५०६ (२),३४ नुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण गौडा यांचे किरणामालाचे दुकान आहे. 12 मार्चला संध्याकाळी त्यांच्या दुकानात रमेश गवळी आला आणि त्याने 500 रुपयांची देणगी द्या अशी मागणी लक्ष्मण गौडा यांच्याकडे केली. मात्र 500 रुपयांऐवजी दुकानात असलेल्या पुनीतने 50 रुपये देवू केल्याने त्याने पुन्हा येतो आणि सांगतो अशी धमकी देऊन गवळी तिथून निघून गेला. 

अर्ध्या तासाने गवळी पुन्हा आला आणि त्याने मीठाचे पॅकेट मागितले. ज्यावेळी दुकानात असलेल्या पुनीतने मिठाच्या पॅकेटचे पैसे दे असं सांगितलं तेव्हा त्याच्यासोबत असलेल्या जोडीदारांनी त्याला आणि त्याच्या भावाला मारायला सुरूवात केली. पुनीतवर चाकूचा वार करत त्याच्या छोट्या भावावर आणि आईवर या हल्लेखोरांनी हल्ला केली. यामध्ये पुनीत गंभीर जखमी झाला असून, जखमींवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Loading Comments