'श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास'च्या वतीने आयोजित श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा सोमवार १९ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला शहरातील ठिकठिकाणाहून आलेल्या हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
घाटकोपर पश्चिमेकडील भटवाडी इथल्या 'श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास'च्या माध्यमातून मागच्या ९ वर्षांपासून या सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार यंदाही श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थांच्या पादुकांसह पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
या पालखी सोहळ्याला क्रांती क्रीडा मंडळ सभागृह इथून सायंकाळी ५ वाजता सुरूवात झाली. त्यानंतर ही पालखी बर्वेनगर ते भटवाडी मार्केट आणि तिथून पुढे सिद्धी गणेश मंदिर चौकाला वळसा घालून पुन्हा क्रांती क्रीडा मंडळ इथं परतली.
रात्री साडेनऊ वाजेपर्यंत रंगलेल्या या पालखी सोहळ्यात १ हजारहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. अत्यंत भक्तीभावाने या वर्षातील पालखी सोहळा संपन्न झाल्याची माहिती 'श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास'चे सचिव भास्कर गावडे यांनी दिली.
हेही वाचा-
म्हणून, मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण नाही- तावडे
आपुल्याच घरात हाल सोसते मराठी..!