पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांचा होळीतून निषेध

 BDD Chawl
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांचा होळीतून निषेध

वरळी - बीडीडी चाळ क्रमांक 76-77 च्या विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी होळी साकारण्यात येते. यंदा पोलिसांवर हल्ला करणाऱ्या नराधमांचा निषेध करणारी होळी या ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या मुलांनी साकारली आहे. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी 51 फुटांचा भस्मासूर तयार करण्यात आला आहे. त्याला जाळून निषेध व्यक्त करण्याची संकल्पना मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील आणि विभागात राहणाऱ्या मुलांची आहे.

बीडीडीचे रहिवासी असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यामध्ये त्यांचा झालेला मृत्यू याचा याठिकाणी निषेध व्यक्त केला आहे. या होळीचे दहन हल्ल्यात मृत्यू झालेल्या पोलीस कुटुंबीयांच्या हस्ते केले जाणार आहे.

समाजात जनजागृती व्हावी, वाईट गोष्टींचा निषेध व्यक्त केला जावा, यासाठी आम्ही दरवर्षी एका वेगळ्या पद्धतीने होळी साजरी करतो, अशी माहिती मंडळाचे कार्यकर्ते रमेश घुले यांनी दिली.

Loading Comments