तुमच्या दादूस या '५' ट्रेंडी राख्या

पण हल्ली भावांना टिपीकल राखी आवड नाही जरा काही असं हटके हवं असतं. तसंच बहिणींना पण राखी पौर्णिमा साजरी करताना भावाला आकर्षक आणि ट्रेंडी राखी बांधावी याकडे हल्ली तरुणींचा कल जास्त असतो.

  • तुमच्या दादूस या '५' ट्रेंडी राख्या
  • तुमच्या दादूस या '५' ट्रेंडी राख्या
  • तुमच्या दादूस या '५' ट्रेंडी राख्या
  • तुमच्या दादूस या '५' ट्रेंडी राख्या
  • तुमच्या दादूस या '५' ट्रेंडी राख्या
SHARE

श्रावण महिना सुरू झाला की चाहूल लागते ती रक्षाबंधन या सणाची. रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचं बंधनबंधुरायाच्या हातात आकर्षक आणि सुंदर राखी असावी असं प्रत्येक बहिणीला वाटतं. यासाठी सध्या बहिणींची राख्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे

पण हल्ली भावांना टिपीकल राखी आवडत नाही जरा काही असं हटके हवं असतं. तसंच बहिणींचा पण राखी पौर्णिमा साजरी करताना भावाला आकर्षक आणि ट्रेंडी राखी बांधावी याकडे कल जास्त असतो. हाच कल पाहता बाजारात वेगवेगळ्या स्वरूपातील राख्यांची रेलचेल सुरू झाली आहे. चला तर मग अशाच काही हटके राख्यांवर नजर टाकूयात.


) फोटो प्रिंट राखी

सध्याचं युग हे डिजिटल आहे. त्यामुळे राख्यांमध्ये पण हा डिजिटलपणा दिसून येत आहे. रक्षाबंधनानिमित्त या राख्यांचा नवा ट्रेंड हिट झाला आहे. राखीला प्रेमाची झालर म्हणून चक्क भावा-बहिणीचे फोटोच राखीवर प्रिंट करून घेणं हा एक नवीन प्रकार रुजू पाहत आहे. या राख्या बाजारात उपलब्ध नाहीत. पण ऑनलाईन आणि डिजिटल स्टुडिओजमध्ये या राख्या उपलब्ध आहेत.


कुठे ऑर्डर कराल?

 https://www.mystypic.com/hellosandwich13/  

) सीड राखी

रक्षाबंधन झाल्यानंतर अनेकदा राखी कुठं तरी आपण ठेवून देतो किंवा त्यांचं विसर्जन करतो. पण यावर एक अफलातून पर्याय आता उपलब्ध झाला आहे तो म्हणजे सीड राखीचा. रक्षाबंधन झाल्यानंतर तुम्ही राखी कुंडीतल्या मातीमध्ये ठेवू शकता. त्यातून रोप उगवतं. एकप्रकारे सीड राखी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं फार फायदेशीर आहे.


यात राखी बनवण्यासाठी कुठल्याच आर्टिफिशियल वस्तूंचा वापर केला जात नाही. यासाठी तांदूळ, ज्वारी, राजगिरा, चंदन, तुळस, परिजात, नाचणी यांसारख्या बियांचा वापर केला जातो

कुठे ऑर्डर कराल?

https://www.instagram.com/seedrakhi/ 


3) 'ब्रो'वाल्या अॅक्रेलिक राख्या

यंदा सगळ्यात जास्त ‘कूल ट्रेंड’ आहे तो म्हणजे ‘वीर’, ‘भाई’, ‘दादा’, ‘ब्रो’ लिहिलेल्या आणि धाग्यात गुंफलेल्या राखीचा. अ‍ॅक्रेलिक आणि लाकूड या दोन प्रकारांत या राख्या उपलब्ध आहेत. अ‍ॅक्रेलिकला सोनेरी रंग असणारी आणि राखीवर कोरलेल्या शब्दाने त्याचं व्यक्तिमत्त्व सांगणारी ‘सोन्याची राखी’ बाजारात मोठय़ा प्रमाणात दिसत आहे.


या राख्यांची किंमत साधारण १०० ते १५० च्या घरात असून त्यांचा खपही मोठ्या प्रमाणावर होतो आहे. ऑनलाइन मार्केट म्हणजे इन्स्टाग्राम, फ्लिपकार्ट किंवा तत्सम साइट्सवरही या राख्या उपलब्ध आहेत.

कुठे ऑर्डर कराल?

https://www.instagram.com/p/Byk5LompOzC/?utm_source=ig_web_copy_link 


) चॉकलेट राखी

तुम्ही कधी 'चॉकलेट राखीट्राय केली आहे का? चॉकलेटची राखी ही काय भानगड आहे? असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेलयावर्षी रक्षाबंधनाला चॉकलेट राखी ट्राय करू शकता. बच्चे कंपनीला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या रंगात या राख्या बनवल्या आहेत.

चॉकलेट १५-२० दिवस आरामात टिकते. त्यामुळे फक्त रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून नंतर ती तुम्हाला खाता येऊ शकते किंवा तुम्ही फ्रिजमध्येही ठेवू शकता. खारमधल्या द डिजर्ट अॅडिक्शन इथं तुम्हाला चॉकलेट राखी मिळेल.  


कुठे ऑर्डर कराल?

ऑर्डरसाठी तुम्हाला ९८२०११४७०४ या नंबरवर संपर्क करावा लागेल. 


) लेदर राखी

तुम्हाला एक हटके, ट्रेंडी आणि स्टाईलीश राखी दाखवणार आहोत आणि ती म्हणजे लेदर राखी. वसईत राहणारे निलेश सचदेव यांना ही आयडियाची कल्पना सुचली. निलेश धारावीतून लेदर आणतात. ब्रेसलेटसारखा आकार देण्यासाठी धारावीतच लेदरची कटिंग केली जाते


निलेश 'लेदर राखी'वर तुम्हाला हवे असलेले नावही कोरून देतो. जसे की, 'हँडसम ब्रो’, 'लवली ब्रो', 'जुगाडू भाई' अशी नावे प्रिंट केलेल्या लेदर राख्या उपलब्ध आहेत. २५० रुपयांपासून या राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 


कुठे ऑर्डर कराल?

निलेश सचदेव स्टोअर Nilesh Sachdev Store या नावाचे त्यांचे फेसबुक पेज देखील आहे. गेल्या २-३ वर्षांपासून निलेश लेदर ब्रेसलेटचा बिझनेस करत आहे.हेही वाचा

'ब्रो'ला भिडणार 'दादूस', बोलीभाषा जपणाऱ्या मराठमोळ्या राख्या


संबंधित विषय
ताज्या बातम्या