Advertisement

शिवाजी पार्कातला उद्यान गणेश

उद्यान गणेश मंदिराची स्थापना १९७० मध्ये करण्यात आली होती. या मंदिरातील मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे १९६६ मध्ये एका व्यक्तीला या ठिकाणी छोटी गणपतीची मूर्ती सापडली होती. ही मूर्ती उजव्या सोंडेची अाहे.

शिवाजी पार्कातला उद्यान गणेश
SHARES

गणेशोत्सव म्हटलं की सर्व गणेशभक्तांच्या डोळ्यासमोर येतं ते सिद्धीविनायक मंदिर. पण मुंबईत सिद्धीविनायक मंदिराप्रमाणेच बरीच गणेश मंदिरं आहेत. या गणेश मंदिरांची ख्याती दूरवर नसली तरीही या ठिकाणी मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो. अशा मुंबईतल्या एका गणपती मंदिराची माहिती आज आपण घेणार आहोत. ते म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथील उद्यान गणेश मंदिर.




छोटी मूर्ती सापडली

उद्यान गणेश मंदिराची स्थापना १९७० मध्ये करण्यात आली होती. या मंदिरातील मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे १९६६ मध्ये एका व्यक्तीला या ठिकाणी छोटी गणपतीची मूर्ती सापडली होती. ही मूर्ती उजव्या सोंडेची अाहे. रीतसर पूजा करून मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानंतर १९७० मध्ये छोटसं मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलं. मूर्ती उद्यानात सापडली असल्यामुळं या मंदिराला उद्यान गणेश मंदिर असं नाव देण्यात आलं. २०१२ साली मंदिराची पुर्नबांधणी करण्यात आली.  


बाराही महिने कार्यक्रम

या मंदिरात गणेशोत्सवाच्या काळात, तसंच बाराही महिने धार्मिक कार्यक्रम केले जातात. सत्यनाराणाची पूजा, सत्य विनायक, रुद्र, सोडपचार पूजा यांसारखे कार्यक्रम येथे होतात. माघी गणेशोत्सवात जन्म किर्तन आणि पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात. तसंच शेवटच्या दिवशी गणपती बाप्पाची पालखी काढली जाते. 


सामाजिक कार्य

या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे गणेशभक्तांकडून दिल्या जाणाऱ्या देणगीमधून मंदिरातर्फे मुंबईसह ठाणे जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय कार्यक्रम राबवले जातात. तसंच १८ वर्षाखालील मुलांसाठी शालेय कबड्डी स्पर्धा ठेवली जाते. त्याचप्रमाणं शाळेतील गरजू विद्यार्थांना गणवेश दिले जातात.



हेही वाचा -

११ दिवस बाप्पासाठी बनवा ११ प्रकारचे मोदक, रेसिपी खास तुमच्यासाठी...

'ही' अाहेत मुंबईतील सर्वात जुनी गणेश मंडळं




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा