Advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर!

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीत अमित शाह हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्याची शक्यता आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर!
SHARES

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईत येणार आहेत. मागील काही वर्षांपासून अमित शाह हे मुंबईतील बाप्पांचे दर्शन घेत आहेत. अमित शाह हे आपल्या मुंबई दौऱ्यात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट घेणार आहेत.

अमित शाह हे 2017 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. तेव्हापासून अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात. मुंबई दौऱ्यात वांद्रे येथील आशिष शेलार यांच्या गणेशोत्सव मंडळादेखील शाह यांनी याआधी भेट दिली आहे.

मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये कोविडमुळे अमित शाह यांना लालबागच्या राजाचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र, यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येणार आहेत. त्याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जाणार आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपने शिवसेनेच्या ताब्यातील महापालिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्याचा चंग भाजपने बांधला आहे. मागील 2017 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने मोठी झेप घेतली होती. शिवसेना आणि भाजपमध्ये अवघ्या काही जागांचा फरक होता.

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीत अमित शाह हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्याची शक्यता आहे. शिंदे गट आणि भाजप ही निवडणूक एकत्रपणे लढवणार आहेत.

तर, दुसऱ्या बाजूला शिवसेना महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढणार की राष्ट्रवादीसोबत आघाडी करून निवडणूक लढणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही. मुंबई काँग्रेसमधील एक मोठा गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहे.



हेही वाचा

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घोषणा

मनसे प्रमुख राज ठाकरेंना पाेलिसांनी बजावली नाेटीस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा