माहिम दर्ग्याचं थेट प्रक्षेपण मुंबई लाइव्हवर

 Mahim Railway Station
माहिम दर्ग्याचं थेट प्रक्षेपण मुंबई लाइव्हवर
माहिम दर्ग्याचं थेट प्रक्षेपण मुंबई लाइव्हवर
See all

माहिम - मुंबईसह देशभरातल्या मुस्लिम बांधवांसाठी माहिम दर्ग्यात भरणारा 10 दिवसांचा मेळा हा आकर्षणाचा विषय असतो. विशेष म्हणजे फक्त मुस्लिम बांधवच नसून सर्वच धर्मिय या दरम्यान माहिम दर्ग्याला भेट देतात. यंदा 13 ते 23 डिसेंबरपर्यंत हा मेळा होणार आहे. मुंबई लाइव्हवर संध्याकाळी 6.30 ते 7.30 वाजेपर्यंत माहिम दर्ग्यातील मजार दर्शनाचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. सालाबादप्रमाणे यंदाही दर्ग्यातील मजारवर मुंबई पोलिसांकडून पहिली चादर चढवली जाणार आहे. माहिम दर्ग्यातील मजार दर्शनाचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी https://youtu.be/4NPn_zgfUAM येथे क्लिक करा.

Loading Comments