शाब्बास मुंबईकर !

 Pali Hill
शाब्बास मुंबईकर !
शाब्बास मुंबईकर !
शाब्बास मुंबईकर !
शाब्बास मुंबईकर !
शाब्बास मुंबईकर !
See all

मुंबई - दिवाळी संपली आणि चर्चा सुरू झाली ती दिवाळीदरम्यान झालेल्या ध्वनीप्रदुषणाची. मात्र गेल्या 2 वर्षांपेक्षा यंदा मुंबईत फटाक्यांमुळे होणाऱ्या या आवाजाची तीव्रता कमी झाल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या आकडेवारीनुसार यंदा कांदिवलीच्या स्टेशन रोड परिसरात सर्वात कमी म्हणजेच 49.1 डेसिबल इतकी आवाजाची तीव्रता नोंदवण्यात आली. रात्रीच्या वेळची ही आकडेवारी असून दिवसाची आकडेवारी लक्षात घेतल्यास गिरगावच्या मेट्रो सिनेमा परिसरात 62.3 इतक्या डेसिबल तीव्रतेची नोंद करण्यात आली आहे. तर गिरगावच्या खालोखाल बोरिवली वेस्टच्या मेकडोनाल्ड परिसरात 68 डेसिबलची नोंद करण्यात आली. अर्थात, डेसिबलची ही मर्यादाही जास्तच असल्यामुळे अजूनही मुंबईकराना लांबचा पल्ला गाठायचा आहे. पण यंदा मुंबईकरांनी दाखवलेल्या समजुतदारपणाचं कौतुक तर करायलाच हवं. आणि असाच समजुतदारपणा मुंबईकर दरवर्षी दाखवतील अशी अपेक्षा आहे.

मुंबईतल्या प्रत्येक ठिकाणानुसार आवाजाची आकडेवारी पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा- http://mpcb.gov.in/envtdata/pdf/Copy_of_MPCB_Noise_Monitoring_Diwali_Comparison_data_last_3_YEAR_ALL_THE_LOCATION_2016.pdf

Checklist

Loading Comments