Advertisement

आमरस पुरी खायचीय? मग मुंबईतल्या '५' हॉटेल्सना भेट द्या


आमरस पुरी खायचीय? मग मुंबईतल्या '५' हॉटेल्सना भेट द्या
SHARES

उन्हाळ्यात सगळे उकाड्याने हैराण असतात. पण या दिवसांत दिलासा मिळतो तो बाजारातील आंब्यांमुळे. महाराष्ट्रात आंबा किती आवडीनं खाल्ला जातो हे काही वेगळं सांगायची गरज नाही.  

आंबा अनेक प्रकारे खाल्ला जातो.  त्यातलाच एक प्रकार म्हगणजे आमरस-पुरी. आंब्याचा रस आणि त्याच्यासोबत गरमा-गरम पुऱ्या... आहाहा... तोंडाला पाणी सुटलं. प्रत्येकवेळी तरी घरच्या घरी आमरस-पुरी बनवणं शक्य नसतं. मग अशा वेळी आमरस खाण्याची इच्छा कशी पूर्ण करायची? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

आम्ही आज तुम्हाला अशाच हॉटेल्समध्ये घेऊन जाणार आहोत जिथे तुम्हाला घरच्यासारखी आमरस-पुरी चाखता येईल. 


१) पंचम पुरीवाला

फोर्ट इथलं पंचम पुरीवाला या हॉटेलमध्ये एका मोठ्या वाटीत आमरस पुऱ्या वाढल्या जातात. यात वेगळेपण असं की या पुऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. म्हणजे पनीर पुरी, मसाला पुरी, पालक पुरी, साधी पुरी. अशा पुऱ्यांची रेंजच इथे तयार असतात. 


किंमत : १५०

पत्ता : ८, १०, पेरीन नरीमन मार्ग, बोराबाजार प्रिसिंट, बालार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई


२) गोल्डन स्टार थाळी 

गोल्डन स्टार थाळी हॉटेलमध्ये आमरस स्पेशल थाळी असते. यावर्षी ३० मार्च ते २३ जूनपर्यंत ही थाळी असणार आहे. या काळात वेगवेगळ्या दिवसांसाठी वेगवेगळे पदार्थ वाढले जातात.  मात्र आमरस हा ठरलेलाच असेल. 


किंमत : ५०० (थाळी)

पत्ता : ३३०, राजा राम मोहन रॉय, चर्नी रोड स्टेशन


३) सोअम

सोअम हे एक गुजराती हॉटेल आहे. तुम्हाला इथं हापूस आंब्यापासून बनलेली उत्तम आमरस पुरी मिळेल. इथं फक्त हापूसपासून आमरस तयार करतात. गोडवा वाढवण्यासाठी साखरेचा वापर केला जात नाही. हा आमरस तुम्ही फुलके किंवा मग आपल्या पारंपारिक पद्धतीने पुरी सोबत खाऊ शकता.


किंमत : २५०

पत्ता : सद्गुरू सदन, बाबुलनाथ मंदिराच्या समोर, गिरगाव चौपाटी


४) आस्वाद हॉटेल

दादर भागाच्या जवळपास राहणाऱ्या पब्लिकसाठी ही जागा अगदी योग्य आहे. या ठिकाणी अगदी आपल्या मराठी पद्धतीनं आमरस पुरी तयार केली जाते.

किंमत : १७०

पत्ता ६१, मेजवानी, सदानंद, गोखले रोड, अमर हिंद मंडळाच्या समोर, दादर पश्चिम

५) खानदानी राजधानी

हे हॉटेल्स राजस्थानी पक्वनांसाठी प्रसिद्ध आहे. आंब्याच्या मौसमात नेहमीच्या थाळीसोबत तुम्हाला आमरस पुरी पण चाखायला मिळेल. आमरस पुरी सोबत इथं मँगो हलवा, मँगो पुलाव पण मिळतो.


किंमत : ५०० (थाळी)

पत्ता : तिसरा मजला, आर सिटी मॉल, घाटकोपर पश्चिम.


हेही वाचा

आईस्क्रिमला महाराष्ट्रीयन तडका म्हणजे 'सिजलिंग पुरणपोळी'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा