मुंबईतले हे ७ प्रसिद्ध वडापाव खाल्ले नाहीत मग काय खाल्लं?

मुंबईकरांना वडापावविषयी विशेष अभिमान. दादरमध्ये जरी वडापावचा जन्म झाला असला तरी पूर्ण मुंबईनं त्याला उचलून धरलं आहे आणि याचंच उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईकरांचा जीव की प्राण असलेल्या वडापावचे पोस्टल स्टॅम्प देखील आहेत

  • मुंबईतले हे ७ प्रसिद्ध वडापाव खाल्ले नाहीत मग काय खाल्लं?
  • मुंबईतले हे ७ प्रसिद्ध वडापाव खाल्ले नाहीत मग काय खाल्लं?
  • मुंबईतले हे ७ प्रसिद्ध वडापाव खाल्ले नाहीत मग काय खाल्लं?
  • मुंबईतले हे ७ प्रसिद्ध वडापाव खाल्ले नाहीत मग काय खाल्लं?
  • मुंबईतले हे ७ प्रसिद्ध वडापाव खाल्ले नाहीत मग काय खाल्लं?
  • मुंबईतले हे ७ प्रसिद्ध वडापाव खाल्ले नाहीत मग काय खाल्लं?
  • मुंबईतले हे ७ प्रसिद्ध वडापाव खाल्ले नाहीत मग काय खाल्लं?
SHARE

मुंबई आणि वडापाव हे समीकरण अफलातूनच आहे. वडापाव हे फक्त मुंबईचं स्ट्रीट फूडच नाही तर दिवस रात्र घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला परवडणारा आणि पोट भरणारा पदार्थ आहेत्यामुळे मुंबईकरांना वडापावविषयी विशेष अभिमान. दादरमध्ये जरी वडापावचा जन्म झाला असला तरी पूर्ण मुंबईनं त्याला उचलून धरलं आहे आणि याचंच उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईकरांचा जीव की प्राण असलेल्या वडापावचे पोस्टल स्टॅम्प देखील आहेत. आज आम्ही तुम्हाला मुंबईत वडापावसाठी फेमस असलेल्या काही ठिकाणांची ओळख करून देणार आहोत.


कुंजविहार वडापाव७० वर्षांपासून ठाण्यातील लोकप्रिय वडापावच्या यादीत कुंजविहारचा वडा हा प्रथम स्थानी आहे. वड्यात जपलेली पारंपारिकता त्याची चव आणि दर्जा टिकवण्यासाठी घेतलेली मेहनत या सगळ्यांमुेळे ठाण्याचा कुंजविहार वडापाव फेमस आहे. वड्याचा आकार मोठा असल्यानं पोट भरतं आणि मन तृप्त होतं


अशोक वडापावप्रभादेवी इथला अशोक वडापाव हा किर्ती वडापाव म्हणूनही ओळखला जातोगेल्या ३०-३५ वर्षांपासून अशोक काका वडापाव विकत आहेत. मुंबईकरच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटी देखील इथल्या वडापावच्या प्रेमात पडले आहेत. वडापाव आणि चुरा-पाव ही इतली खासियत. विशेष म्हणजे एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरलं जात नाही.


ग्रॅज्युएट वडापावपहिलं तर ज्याला हे नाव सुचलं त्याला २१ तोफांची सलामी. नेमकं याचं नाव ग्रॅज्युएट वडापाव का बरं ठेवलं असेल? असा प्रश्न तुम्हाला काय मला देखील पडला आहे. असो... भायखळा स्थानकाच्या पूर्वेला हे दुकान आहे. इथला वडापाव अव्वल दर्जाचा असून गेल्या १७ वर्षांपासून इथं वडापाव विक्री होते.


) आराम वडापावदक्षिण मुंबईतलं सीएसटी, मुंबई महापालिकेच्या समोरचं हे प्राईम लोकेशन. ८ अाॅगस्ट १९३९ मध्ये म्हणजे अगदी इंग्रजांच्या काळात भाऊ उर्फ श्रीरंग तांबे या मराठी माणसानं हॉटेल सुरू केलं. आरामचा वडापाव तुम्हाला चीझबटर ग्रिल्ड पावसोबत किंवा नुसताही मिळतोया वड्याची भाजी पांढऱ्या रंगाची असतेतांबे कुटुंबाची तिसरी पिढी हा व्यवसाय सांभाळते. मात्र वड्याच्या चवीत तसुभरही फरक पडलेला नाही


) भाऊ वडापावभांडूपमधलं फेमस वडापाव सेंटर म्हणजे भाऊ वडापाव. भांडूप इथल्या वाल्मिकी नगर भागात हे दुकान आहे


) गजानन वडापावठाण्यात तुम्ही या वडापावचा आस्वाद घेऊ शकता. इथल्या वडापावपेक्षा त्याची पिवळी चटणी जास्त हिट आहे. ठाणे स्टेशनच्या पश्चिमेस हे दुकान आहे. इथं वडापावसोबत सुक्या खोबऱ्याची लाल चटणी किंवा ओल्या खोबऱ्याची पांढरी चटणी मिळत नाहीतर बेसनपासून तयार केलेली एक आगळीवेगळी पिवळी चटणी मिळते. ही चटणीच गजानन वडापावची शान आहे


बोरकर वडापावगिरगावच्या बोरकर वडापावची ख्याती सगळीकडे पसरली आहे. गिरगाव चौपाटीवर बोरकर वडापावची ब्रांच आहे. इथल्या चटणीला अधिक पसंती दिली जाते. चटणीमुळे वडापावच्या चवीत आणखी भर पडते. गिरगावच्या पै हॉस्पिटलजवळ बोरकर वडापाव सेंटर आहेहेही वाचा

ठाण्यात भरणार 'मोदक महोत्सव'
संबंधित विषय
ताज्या बातम्या