Advertisement

ठाण्यात भरणार 'मोदक महोत्सव'


ठाण्यात भरणार 'मोदक महोत्सव'
SHARES

बाप्पांचा लाडका नैवेद्य म्हणजे मोदक... गणेश चतुर्थीला हमखास बाप्पाला घरोघरी या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. घरात मोदक बनलाय म्हटल्यावर त्यावर छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीच नजर असते. बाप्पाला नैवेद्य दाखवला की सर्वच त्या मोदकांवर तुटून पडतात. आता मोदकावरील बाप्पाचं आणि आपल्या सर्वांचं प्रेम काही वेगळं सांगायला नकोगणेशोत्सवादरम्यान सुरुवातीला घरोघरी पारंपरिक मोदक पाहायला मिळायचे. पण आता वेगवेगळ्या रंगातील आणि आगळ्यावेगळ्या स्टफिंगच्या मोदकांना देखील अधिक पसंती दिली जाते. वेगवेगळ्या रंगातल्या आणि स्टफिंगच्या मोदकांना मिळणारी ही पसंती पाहता ठाण्यात 'मोदक महोत्सवा'चं आयोजन करण्यात आलं आहे.वेगवेगळ्या मोदकांचं दर्शन

अवघा महाराष्ट्र मोदकाच्या प्रेमात पडला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लोकांच्या याच प्रेमाखातर मीठी इंडिया तर्फे ठाण्यात मोदक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोदक महोत्सवात माव्याचे, उकडीचे, काजू पेस्टचे, बदामाचे, पंचखाद्याचे अशा असंख्य प्रकारांचे मोदक एकाच छताखाली चाखण्याची संधी गणेशभक्तांना उपलब्ध झाली आहे.


महाराष्ट्राची स्वीट डिश

गणरायाचा नैवेद्य आणि महाराष्ट्राची पारंपरिक स्वीट डिश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोदकाचे विविध प्रकार, राज्यातील मोदक बनवणाऱ्या व्यावसायांचा विकास गेल्या काही वर्षात झपाट्यानं झाला आहे. याचंच दर्शन मोदक महोत्सवात मोदकप्रेमींना घडणार आहे. या महोत्सवात भारतीय पारंपारिक मिठाई बनवणारे ७५ हून अधिक उत्पादक-विक्रेते या महोत्सवाच्या निमित्तानं एकत्र येणार आहेतगणपती बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य अशी मोदकाची ओळख असली तरी तो एक अस्सल भारतीय मिठाईचा प्रकार आहे. चॉकलेट, केक यांसारख्या पाश्चात्य पदार्थांमुळे मोदकासारख्या मिठाईकडे दुर्लक्ष होतंय. आपल्या समृद्ध गोडधोड परंपरेचा वारसा आजच्या पिढीलाही कळावायासाठी मोदक महोत्सवाचं आयोजन केलं जातंअशी माहिती मोदक महोत्सवाचे आयोजक मीठा इंडियाचे निमंत्रक कॅप्टन कमल कड्ढा यांनी दिली.कधी  : ८ आणि ९ सप्टेंबर 

कुठे  : ठाणे क्लब, तीनहात नाका, ठाणे (पू.)हेही वाचा

बाप्पासाठी खास २१ प्रकारचे मोदक!
संबंधित विषय
Advertisement