Advertisement

बाप्पासाठी खास २१ प्रकारचे मोदक!


बाप्पासाठी खास २१ प्रकारचे मोदक!
SHARES

गणपतीचं आगमन झालं की बाप्पाचा आवडता पदार्थ अर्थात 'मोदक' सगळ्यांच्याच घरी पाहायला मिळतात. कारण जसा बाप्पाला मोदक आवडतो. तसा आपल्यातल्या प्रत्येकालाच मोदक खायला आवडतो. पण नेहमीच्याच तांदळाच्या पिठातल्या उकडीच्या मोदकांपेक्षा तुम्हाला बाप्पासाठी काही वेगळे मोदक करायचे असतील, तर आम्ही तुम्हाला इथे बप्पासाठी वेगळे, खास आणि चविष्ट असे मोदक कसे करता येतील हे सांगतोय.


1) गूळ कोहळ्याचे मोदक :

कृती :  हा प्रकार विदर्भातील आतल्या गावातला. गूळ, लाल कोहळा व तेवढीच कणीक घेऊन एकत्र मळावे. मोदकाचा आकार देऊन मंद आचेवर तळावे.

2) फ्रुट मोदक :

कृती : वेगवेगळया प्रकारची फळे मिक्स फ्रूट जॅममध्ये मिसळून हे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळून घ्यावे.

3) पनीरचे मोदक :

कृती : पनीरमध्ये साखर, काजू, किसमिस, वेलची पावडर भरून हे सारण रवा, मैद्याच्या पोळीमध्ये भरून तळून काढावे. हा मोदकाचा प्रकार मला दिल्लीला एका ठिकाणी खायला मिळाला.


4) खव्याचे मोदक :

कृती : हा प्रकार तसा सगळीकडे दिसतो. यामध्ये खव्यात साखर, केशर घालून, भाजून साच्यात घालून मोदक करतात.

5) बेक केलेले मोदक :

कृती : खोबरं, किसमिस, खव्याचे सारण मैद्याच्या सप्तपारीमध्ये भरून बेक करावे.

6) मिक्स मोदक

कृती : पनीर, खवा, साखर, केशर, वेलची एकत्र मिक्सरमध्ये वाटून याचे मोदक साच्यामध्ये बनवून वाफवून घ्यावे.

7) पुरणाचे मोदक :

कृती :  पुरणाचे सारण मैद्याच्या पारीमध्ये भरून मोदक तळून घेतात किंवा वाफवूनसुद्धा घेतात.

8) संदेश मोदक :

कृती : पनीर, खवा, साखर, केशर, वेलची एकत्र मिक्सरमध्ये वाटून याचे मोदक साच्यामध्ये बनवून वाफवून घ्यावे.

9) मनुकांचे मोदक :

कृती :  मनुका, काजू एकत्र करून त्यात थोडी दूध पावडर घालून त्याचे मोदक वळावे.

10) खोबरं-मैद्याचे मोदक :


कृती : हा मोदक प्रकार सर्व ठिकाणी आढळून येतो. रवा, खोबरं, खवा, साखर एकत्र करून हे सारण मैद्याच्या वाटीत भरून मंद आचेवर तळावे.

11) कॅरामलचे मोदक :

कृती : पनीर, खवा, काजू, किसमिस, साखर एकत्र करून त्याला मोदकाचा आकार द्यावा. हा मोदक साखरेच्या कॅरामलमध्ये बुडवून थंड करून सर्व्ह करावा.

12) काजूचे मोदक :

कृती :  काजू कतलीचे सारण घेऊन या मध्ये खवा, खडीसाखर भरून याला मोदकाचा आकार द्यावा.

13) फुटाण्यांचे मोदक :

कृती :  फुटाणे बारीक करून त्यात साखर व तूप घालून चांगले मळावे या पिठाला मोदकाचा आकार द्यावा. हा प्रकार गरम न करता चटकन होणारा प्रकार आहे.

14) तांदळाचे गुलकंदी मोदक 

कृती : तांदळाच्या उकडीमध्ये गुलकंदाचे सारण भरून हे मोदक मंद आचेवर तळा किंवा वाफवून घ्या.

15) पोह्यांचे मोदक :

कृती : पोहे चांगले भिजवून त्याचा गोळा मळावा. त्यामध्ये आपल्याला हवे ते सारण भरून मंद आचेवर तळावे.

16) तीळगुळाचे मोदक :

कृती : गुळाचा पाक तयार करून त्यात भाजलेले तीळ घालावे व हे सारण कणकेच्या पारीमध्ये भरून मंद आचेवर तळावे किंवा तीळ व गुळाचे जे सारण आहे ते थोडे गरम असतानाच साच्यामध्ये घालून त्याचे मोदक करावे. हा प्रकार यवतमाळ भागात करतात व तिळी चतुर्थीला याचा नैवेद्य दाखवतात.

17) चॉकलेटचे मोदक :

कृती :  खवा, खोबरं, दाणे बारीक करून मळून घ्या. त्यानंतर याला मोदकाचा आकार द्यावा व एकेका मोदकाला हॉट चॉकलेट सॉसमध्ये बुडवून थंड करून सर्व्ह करा.

18) शेंगदाण्यांचे मोदक :

कृती :  गूळ आणि शेंगदाणे एकत्र करून त्यात काजू, किसमिस घालावे व उकडलेला बटाटा व साबुदाण्याच्या पिठाच्या पारीमध्ये भरून तळून घ्यावे.

19) पंचखाद्याचे मोदक :

कृती : पंचखाद्य एकत्र करून म्हणजेच सुके खोबरे, खारीक, खसखस, बदाम आणि खडीसाखर हे सारण मैद्याच्या पारीत भरून डीप फ्राय करा.

20) बेसनाचे मोदक :

कृती :  बेसनाच्या लाडवाच्या सारणाला साच्यात घालून मोदकाचा आकार द्यावा व मधे एक एक काजू भरावा.

21) बटाटयांचे मोदक :

कृती : बटाट्यामध्ये खवा, साखर, काजू, किसमिस घालून त्याचा हलवा बनवावा व साच्यामध्ये घालून मोदक करावे. वरून दुधाची पावडर लावावी.



हेही वाचा

तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांना उकडीच्या मोदकाची मेजवानी!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा