Advertisement

फूड डिलीव्हरीच्या व्यवसायात अॅमेझॉनची उडी

स्विगी, झोमेटोनंतर आता खवय्यांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे तो म्हणजे अॅमेझॉन...

फूड डिलीव्हरीच्या व्यवसायात अॅमेझॉनची उडी
SHARES

वेळी अवेळी लागलेली भूक भागवण्यासाठी आता अनेक पर्याय आहेत. त्यात आटा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. स्विगी, झोमेटोनंतर आता खवय्यांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. या यादीमध्ये ई-कॉमर्स जगतातील मोठ्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या एका कंपनीचं नाव देखील जोडलं जाणार आहे.

अमेरिकेतील मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असणारी अॅमेझॉन (Amazon) ही कंपनी भारतीय बाजारात फूड डिलीव्हरीच्या व्यवसायात उतरणार आहे. मार्चपर्यंत अॅमेझॉन फूड व्यवसायात उतरू शकते. त्यामुळे अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस भारतातील फूड डिलीव्हरी व्यवसायात स्विगी आणि झोमॅटोला टक्कर देण्यासाठी तयार झाले आहेत. याकरता बंगळुरूमध्ये पायलट प्रोजेक्टला देखील सुरूवात झाली आहे. विविध रेस्टॉरंट्सबरोबर जोडण्यासाठी जेफ बेजोस यांनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्तींचे व्हेंचर असणाऱ्या कॅटामरानबरोबर सुद्धा हातमिळवणी केली आहे.

इकॉनॉमिक्स टाईम्सच्या अहवालानुसार, अॅमेझॉननं फूड डिलीव्हरी देण्यासाठी दोन तासांत डिलीव्हरी करणाऱ्या सप्लाय चेनची मदत घेण्यात येणार आहे. अ‍ॅमेझॉननं यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. अ‍ॅमेझॉन अशा वेळी अशा व्यवसायात प्रवेश करीत आहे जेव्हा स्विगी आणि झोमाटोनं बहुतांश ग्राहकांना आपल्या बाजूनं केलं आहे.

Uber Eats ने सुद्धा फूड डिलीव्हरी व्यवसायाला रामराम ठोकला आहे. त्यांनी आपला हा व्यवसाय झोमॅटोला विकला आहे. त्यामुळे अॅमेझॉन जर चांगल्या ऑफर्स घेऊन बाजारात येत असेल तर त्यांच्यासाठी ही गुंतवणूक फायद्याची ठरण्याची शक्यता आहे. अॅमेझॉन ही नवीन सेवा याच महिन्यात घेऊन येण्याची शक्यता आहे. अॅमेझॉन प्राईम वापरणाऱ्यांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.



हेही वाचा

Zomato आणि Swiggy वर सरकारची नजर

अंडा समोसा ते चॉकलेट समोसा, इथं मिळतात हटके समोसे, नक्की ट्राय करा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा