नवरोज स्पेशल - पानी कम चाय आणि ब्रुनमस्काचे हॉट स्पॉट!

नवरोज स्पेशल - पानी कम चाय आणि ब्रुनमस्काचे हॉट स्पॉट!
नवरोज स्पेशल - पानी कम चाय आणि ब्रुनमस्काचे हॉट स्पॉट!
नवरोज स्पेशल - पानी कम चाय आणि ब्रुनमस्काचे हॉट स्पॉट!
नवरोज स्पेशल - पानी कम चाय आणि ब्रुनमस्काचे हॉट स्पॉट!
See all
मुंबई  -  

मुंबई - मुंबईच्या आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक बदलांचा साक्षीदार असणारी इराणी हॉटेल संस्कृती हळूहळू लोप पावतेय. पण असे असले तरी अनेक समस्यांचा सामना करत इराणी हॉटेल्स आजही टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

1950 मध्ये 300 च्या आसपास इराणी हॉटेल्स मुंबईत होती. पण आता जेमतेम 15 ते 20 इराणी हॉटेल्स तग धरून आहेत. यातल्या अनेक हॉटेल्सनी ‘शंभरी’ ओलांडली आहे. त्यापैकीच एक म्हणजे मेट्रो सिनेमासमोर असलेलं ‘कयानी अँड कंपनी’. कयानी म्हणजे इराणी हॉटेल्सचा 113 वर्षांचा जिवंत इतिहास. चहा, ब्रुनमस्का आणि खारी ही कयानीची खासियत. पण काळाच्या ओघात टिकून राहण्यासाठी कयानीत खिमा पाव, चिकन पॅटीस असे नवे पदार्थही विकले जातात. पण इथली स्पेशल डिश आजही या सगळ्यांवर भारी पडते.

पण विविध कर, वाढती बिले आणि हॉटेलचा दर यांचा ताळमेळ राखणे कठीण होत चालले आहे, असे कयानी अँड कंपनीचे मालक फारूख सोकरी यांनी सांगितले. तसेच नवीन पिढीला हॉटेलमध्ये स्वारस्य नाही. नव्या पिढीला परंपरागत हॉटेल चालवण्यापेक्षा नोकरी करणे जास्त सोईस्कर वाटते. त्यामुळे आपल्यानंतर या हॉटेलचे काय होणार? अशी चिंता कयानी अँड कंपनीचे मालक फारूख सोकरी यांना सतावतेय.

धोबी तलाव येथील ससानियनच्या मावा केक आणि पुडिंगची मुंबईकरांमध्ये भलतीच क्रेझ आहे. पण त्यासोबतच पेस्ट्री, व्हेज रोल, वॉलनट बिस्किट्स, आलू टोस्ट, जॅम रोल, जाम कुकीज, पीनट बटर कुकीज, ब्रुनमस्का, बनमस्का, चिकन-मटण पॅटिस असे एक ना अनेक पदार्थ ससानियनची स्पेशालिटी टिकवून आहेत. पण आता स्पर्धा म्हटली की स्वत:मध्ये बदल हा आलाच. तसा तो ससानियननंही केला. आता ससानियनच्या मेनूमध्ये सिजलर आणि चायनीज फूडही दाखल झालंय.

मुंबईला मस्का पावच्या चवीची खरी ओळख करून दिली ती इराण्यांनी. ही चव नाहीशी होऊ नये म्हणून चित्रपटनिर्माते डॉ. मन्सूर याइदी यांनी गेल्या वर्षी माहिममध्ये ‘कॅफे इराणी चाय’ हे इराणी हॉटेल सुरू केले. टिपिकल इराणी हॉटेलमधल्या खुर्च्या, इराणी कॅफेचे अस्तित्व दाखवणाऱ्या मिरर वॉल्स, अवघ्या सहा टेबल्सचं हे हॉटेल. अवघ्या एक वर्षात मुंबईकरांनीही या हॉटेलला चांगलीच पसंती दिली. या कॅफेच्या नावात दोन आय आहेत आणि हे दोन आय इंडिया आणि इराण यांच्यातील मैत्री दर्शवतात.

कॅफे कॉफीडे (सीसीडी) आणि मॅक्डीच्या जमान्यात इराणी हॉटेल्स इराणी संस्कृती जतन करून आहेत. त्यामुळे आपल्याला मावाकेक, ब्रुनमस्का आणि पुडिंगची चव चाखता येतेय हे विसरून चालणार नाही.


(मुंबई लाइव्हचे अॅन्ड्रॉईड अॅप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.