Advertisement

ठाण्यात शुक्रवारपासून बिर्याणी फेस्टिव्हलचं आयोजन


ठाण्यात शुक्रवारपासून बिर्याणी फेस्टिव्हलचं आयोजन
SHARES

तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी खायच्या असतील तर मग तुमच्यासाठीच ठाण्यात बिर्याणी फेस्टिव्हलचं आयोजन केलं आहे. स्वराज्य इव्हेंन्ट्सतर्फे या बिर्याणी फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. बिर्याणी फेस्टिव्हलमध्ये खवय्यांना विविध प्रकारच्या २० बिर्याणींची चव चाखता येणार आहे. 


व्हेज-नॉनव्हेज बिर्याणीची ट्रिट

बिर्याणी फेस्टिव्हलमध्ये प्रसिध्द ब्रॅन्डच्या बिर्याणीबरोबर व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणी उपलब्ध असणार आहेत. दिल्ली बिर्याणी, हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, कोवळ्या बांबूमध्ये दम मारलेली बांबू बिर्याणी, टुना फिशची बिर्याणी, क्रॅब बिर्याणी, मुस्लीम नजाकतीची बेहरोज बिर्याणी, अंडे-चिकन आणि मटण यापासून बनवलेली झमझम बिर्याणी अशा बिर्याणींचा आस्वाद तुम्हाला घेता येणार आहे.


कडकनाथ बिर्याणी स्पेशल

कडकनाथ कोंबडीची कडकनाथ बिर्याणी हे देखील यंदाच्या बिर्याणी फेस्टिव्हलचे वेगळे आकर्षण असणार आहे. इटालियन पदार्थाची आवड असलेल्यांसाठी सॉसेस वापरून केलेली इटालियन बिर्याणी तसंच लेबनीज चीजच्या स्वादाची लेबनीज चीज सीख बिर्य़ाणीची देखील टेस्ट खवय्यांना चाखता येणार आहे. शाकाहारींसाठी व्हेज बिर्याणी, पनीर टिक्का बिर्याणी, शाही व्हेज बिर्याणी देखील उपलब्ध असणार आहे.


डबल धमाका

७ डिसेंबर म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळी बिर्याणी फेस्टिव्हलचे उदघाटन होणार आहे. रविवारपर्यंत रोज संध्याकाळी ५ ते ११ वेळेत फेस्टिव्हल सुरू राहणार आहे.  फेस्टिव्हलच्या ठिकाणी रोज सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम असणार असून लाईव्ह म्युझिक, मेहफिल ए गजल हा मुशायरा अशा अनेक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

कुठे : शिवाजी मैदान, जांभळी नाका, ठाणे (प.)

कधी : ७ डिसेंबर ते ९ डिसेंबर

वेळ : संध्याकाळी ५ ते रात्री ११


हेही वाचा -

चवीनं खाल्ले जाणारे 'हे' पदार्थ भारतीय नाहीतसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा