Advertisement

चवीनं खाल्ले जाणारे 'हे' पदार्थ भारतीय नाहीत

समोसा, इडली, बिर्याणी, गुलाबजाम या पदार्थांना भारतात बरीच मागणी आहे. पण तुम्हाला सांगितलं की, हे पदार्थ भारतीय नाहीत, तर? तुम्हाला विश्वास बसणार नाही.

चवीनं खाल्ले जाणारे 'हे' पदार्थ भारतीय नाहीत
SHARES

भारतीय खाण्याचे किती शौकिन असतात, हे काही वेगळं सांगायला नको. बर्गरपासून ते चायनीज, मॅक्सीकनपर्यंत सर्व पदार्थ आवडीनं खाल्ले जातात. पण या व्यतिरिक्त भारतात असे अनेक पदार्थ आहेत जे आपण लहानपणापासून अगदी चवीनं खातो. समोसा,  इडली, बिर्याणी, गुलाबजाम या पदार्थांना भारतात बरीच मागणी आहे. पण तुम्हाला सांगितलं की, हे पदार्थ भारतीय नाहीत, तर? तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. आज आम्ही तुम्हाला असेच काही पदार्थ सांगणार आहोत जे भारतीय नाहीत.


१) जिलेबी


गरमागरम जिलेबी खाण्याची मजा काही औरच. जिलेबीचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी अशा दिवशी हमखास जिलेबी खाल्ली जाते. सर्वांच्या आवडीचा हा पदार्थ भारतीय नाही. जिलेबी हा पदार्थ मुळचा आहे अरब देशातला. फारसी लोक हा पदार्थ भारतात घेऊन आले. अरेबिकमध्ये याला झिलबिया असं म्हणतात.


२) गुलाबजाम


जेवणानंतर स्वीट डीश म्हणून गुलाबजाम हा पदार्थ हमखास खाल्ला जातो. मात्र, हा गुलाबजाम फारसी लोक भारतात घेऊन आले. फारसीमध्ये गुल म्हणजे फुल तर अब म्हणजे पाणी. फारसी देशांमध्ये गुलाबजामला 'लोकमा' आणि 'लुक्मत-अल-कादी' असं म्हटलं जातं.


३) फिल्टर कॉफी


सकाळी उठलं की कित्येक जणांना कॉफी लागतेच. त्याशिवाय त्यांची सकाळ होत नाही. तसं बघायला गेलं तर दक्षिण भारतामधून कॉफी जगभरात पसरली. पण खरं तर फिल्टर कॉफीही आली आहे येमन या देशामधून. सुफी संत बाबा बुदान हे कॉफीच्या बिया भारतात घेऊन आले होते.


४) इडली


नाश्ता म्हणून आपल्यापैकी अनेक जण इडलीला प्राधान्य देतात. कारण इडली जास्त हेवी पण नसते आणि तेलकट पण नसते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्याला इडली खाणं अधिक पसंत केलं जातं. इडली साऊथ इंडियामधूनच आली आहे असा तुमचा सर्वसाधारण अंदाज असेल. पण इडली साऊथ इंडियामधून नाही तर अरब देशातून भारतात आली आहे. त्यामुळे साऊथ इंडियाच्या सागरी मार्गात ती जास्त लोकप्रिय झाली आहे.


५) समोसा


भारतातल्या गल्ली-बोळामध्ये हल्ली समोसा विकला जातो. भूक लागली असो वा कुठला कार्यक्रम असो त्यात समोसा हा असतोच. पण समोसा भारतीय नसून मध्य पूर्व देशांमधून आला आहे. मध्य पूर्व देशांमध्ये सम्बोसा या नावानं समोसा ओळखला जातो.


६) राजमा


राजमा हा प्रकार पंजाबमधून आला असल्याचा तुमचा गैरसमज आहे. कारण राजमा हा प्रकार पोर्तुगालमधून भारतात आला. राजमा बनवण्याची रेसिपी मॅक्सीकोमधून आली आहे.


७) डाळ-भात

डाळ-भात प्रत्येकाच्या घरात बनतोच. सर्वांच्या आवडीचा असा हा पदार्थ बनवण्यात जास्त वेळ पण जात नाही. असा हा पदार्थ नेपाळमधून भारतात आली आहे.


८) बिर्याणी

बिर्याणीचं नाव घेतल्यावर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. भारतात तसा वेगवेगळ्या बिर्याणी बनवल्या जातात आणि त्या चांगल्या प्रसिद्ध देखील आहेत. अशी ही बिर्याणी तुर्कीचा पारंपरिक पदार्थ असून तुर्की व्यापारांसोबत हा प्रकार भारतात आला.


हेही वाचा

'या' कॅफेत गेम खेळा आणि खाण्यावर डिस्काऊंट मिळवा

साधंसुधं नाही तर हे आहे हल्क सँडविच
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा