Advertisement

साधंसुधं नाही तर हे आहे हल्क सँडविच


साधंसुधं नाही तर हे आहे हल्क सँडविच
SHARES

हल्ली पदार्थांना काय नावं ठेवतील याचा काही नेम नाही. बाहुबली सँडविच, रजनीकांत डोसा अशी भन्नाट नावं पदार्थांना दिली जातात. आता हेच बघा ना गोरेगावमध्ये चक्क 'हल्क सँडविच' मिळतं. हॉलीवूड चित्रपटातील हल्क कॅरेक्टर सर्वांनाच माहीत असेल. पण हल्क नाव एखाद्या पदार्थाला दिलेलं मी तरी पहिल्यांदा ऐकलं आहे.


म्हणून मिळालं हल्क नाव

हॉलीवूड चित्रपटातील हल्क नावाचं कॅरेक्टर अनेकांना माहीत आहे. पण या नावाचं सँडविच पण मिळतं हे सर्वांसाठीच नवीन आहे. हे सँडविच एकाला संपवणं कठिणच आहे. या सँडविचमध्ये ब्रेडचे पाच लेअर असतात. प्रत्येक लेअरमध्ये काही ना काही भरलेले असते


पहिल्या लेअरमध्ये टॉमेटो, कांदा, शिमला मिरची आणि चीझ असते. दुसऱ्या लेअरवर फक्त चीझ असते. तिसऱ्या लेअरवर चिली सॉस आणि पनीर असते. चौथ्या आणि पाचव्या लेअरमध्ये भरपूर चीझ आणि मिक्स भाज्यांपासून बनवलेली त्यांची भाजी असते. सँडविचच्या वरच्या बाजूला चीझ असतं. बापरे... पाच लेअर पाहूनच कोणाचंही पोट भरेल एवढं मोठं हे हल्क सँडविच. जर तुम्हाला हल्क सँडविच खायचे असेल तर यासाठी २९९ रुपये मोजायची तयारी ठेवा.

 

आणखी काही हटके?

हल्क सँडविच शिवाय इथं आणखी एक प्रकार तुम्ही ट्राय करू शकता तो म्हणजे पिझ्झा शॉट्स. पिझ्झा शॉट्स हा प्रकार हटके आहे. पिझ्झा आणि पुरी यांचा अनोखा मिलाप इथं पाहायला मिळतो. पाणी-पुरीच्या पुऱ्यांमध्ये भाजी मिक्स केली जाते. त्यावर त्यांचे स्पेशल सॉस अॅड केले जातात. शेवटी भरपूर चीझ टाकून पिझ्झा शॉट्स सजवले जातात.

गोरेगाव इथला ओबेरॉय मॉल सर्वांनाच माहित असेल. मॉलच्या पुढे असलेल्या गोकुळधाम परिसरात ओम स्नॅक्सचे शॉप आहे. याशिवाय अंधेरीत देखील याची ब्रँच आहे.

कुठे : अनुराग, बँगकॉक कॉलेजच्या समोर, जे.बी. नगर मेट्रो स्टेशनच्या पुढे, चकाला, अंधेरी (पू.)

         गगन शपिंग अॅक्रेड, मिनाक्षी टॉवरच्या समोर, कृष्णा वाटिका मंदिर मार्ग, गोकुळधाम, गोरेगाव (पू.)

 वेळ सकाळी ११ ते रात्री १०


हेही वाचा

या कॅफेत गेम खेळा आणि खाण्यावर डिस्काऊंट मिळवा

मॉनस्टर बर्गर संपवण्याचं बिग चॅलेंज

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा