Advertisement

या कॅफेत गेम खेळा आणि खाण्यावर डिस्काऊंट मिळवा


या कॅफेत गेम खेळा आणि खाण्यावर डिस्काऊंट मिळवा
SHARES

तुम्हाला क्विज गेम खेळायला आवडतो? शाळेत किंवा एखाद्या कार्यक्रमात तुम्ही क्विज कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतला असेल. पण तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलात आणि तुम्हाला एखाद्या क्विज कॉम्पिटिशनमध्ये सहभागी व्हावं लागलं तर? तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत. रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो, क्विज कॉम्पिटिशन खेळायला नाही. पण इथंच तर खरी मजा दडलीय. क्विज खेळून जिंकलात तरच बिलावर डिस्काऊंट मिळेल. 'क्विजर' या कॅफेला ही भन्नाट कल्पना सुचली आहे.असा मिळवा डिस्काऊंट

आता डिस्काऊंट मिळणार असेल तर नक्कीच सर्व अगदी आवडीनं या क्विज कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतील. क्विज गेमवर आधारीत 'क्विजर' हे भारतातील पहिला कॅफे आहे. डिस्काऊंटसाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की, कॅफेत गेल्यावर  तुम्ही तुमची ऑर्डर द्यायची. ऑर्डर येईपर्यंत तुम्हाला टॅब दिला जाईल


तुम्हाला ५ प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरावर तुम्हाला ५ टक्के सुट मिळेल. ५ प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर पुढे खेळायचं असेल तर तुम्ही खेळू शकता. ३ बोनस प्रश्नांची अचुक उत्तरं दिली तर ५० टक्के डिस्काऊंट मिळू शकतो. बॉलिवूड, स्पोर्ट्स आणि सामान्य ज्ञान यावर आधारीत प्रश्न तुम्हाला विचारले जातात.


खाण्याचा हटके मेन्यू

चीझी गुडनेस हा एक वेगळा प्रकार तुम्ही इथं नक्की ट्राय करा. पावामध्ये चीझ आणि गार्लिक बटर स्टफ करून हा प्रकार सर्व्ह करतात. त्यानंतर बेक्ड चीझ पाव भाजी बन्स देखील अप्रतिम आहे. यात पावामध्ये पाव भाजीची भाजी असते. त्याला चीझनं सजवलं जातं. मॅक्सिकन नाचोज हा देखील पदार्थ इथं जास्त पसंत केला जातो. यामध्ये ७ लेअर मॅक्सिकन सॉस असतो आणि वर नाचोसनं सजवलं जातं. याशिवाय चिकन भूना विथ पराठा, स्मोकी तंदूर, कोळंबी पास्ता असे पदार्थ देखील ट्राय करू शकता

कुठे : विरा देसाई रोड, अंधेरी (.)

       आरसिटी मॉल, घाटकोपर


हेही वाचा

आता ट्राय करा चटपटीत पिझ्झा वॉफल

कुकीज शॉट्स एकदा तरी मारा!        

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा