Advertisement

'इथं' मिळतं घरच्यासारखं जेवण

‘Cooked by Moms' या ग्रुपनं घरगुती जेवण अशा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय जे आपल्या घरापासून लांब राहतात किंवा ज्यांना रोज टिफिन आणणं शक्य नाही.

'इथं' मिळतं घरच्यासारखं जेवण
SHARES

वेगवेगळ्या शहरांमधून मुंबईसारख्या शहरात अनेक जण कामासाठी येतात. बाहेरून कामानिमित्त मुंबईत राहणाऱ्यांच्या जेवणाचे मात्र प्रचंड हाल होतात. वारंवार हॉटेलचं खाऊन देखील कंटाळा येतो. घरच्या जेवणाची चवच काही तरी वेगळी असते. ते आपण रोज खाल्लं तरी कंटाळा असा येत नाही. पण घरापासून लांब राहायला आल्यावर घरगुती जेवण खायला मिळणं तसं क्वचितच. हाच विचार करून ‘Cooked by Moms'  या ग्रुपनं घरगुती जेवण अशा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय जे आपल्या घरापासून लांब राहतात किंवा ज्यांना रोज टिफिन आणणं शक्य नाही.


‘Cooked by Moms'ची खासियत

नम्रता तन्ना यांनी ‘Cooked by Moms'ची सुरुवात केली. ‘Cooked by Moms'चे दोन हेतू आहेत. एक तर घरगुती जेवणं वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवणे आणि दुसरं म्हणजे ‘Cooked by Moms'च्या माध्यमातून घरी असलेल्या महिलांना एखादा रोजगार उपलब्ध करून देणे. घरी असलेल्या काही महिलांना हाताशी धरून त्यांनी एक नवीनच संकल्पना प्रत्यक्षात उतरवली.


कंपन्या, रेस्टॉरंटसोबत हातमिळवणी

सर्व महिलांनी एकत्र येत ‘Cooked by Moms' ही एक टिफिन सर्विस सुरू केली. ‘Cooked by Moms'नं अनेक कंपन्यांसोबत आणि रेस्टॉरंटसोबत हातमिळवणी केली आहे. अनेक कंपन्यांच्या कँटिनमध्ये ‘Cooked by Moms'तर्फे जेवणं पुरवलं जातं. तसंच रेस्टॉरंटसोबत यांनी टायअप केलं आहे. आई आपल्या मुलांसाठी ज्याप्रकारे प्रेमानं जेवण बनवते तसंच या महिला जेवणं बनवतात. त्यामुळे इथल्या जेवणाचा आस्वाद तुम्हाला अगदी घरच्यासारखा यईल.

‘Cooked by Moms'
वेबसाईट : 
https://www.cookedbymoms.com/



हेही वाचा

बार्बिक्यू बाईक राईडसाठी तयार आहात?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा