SHARE

चेंबूर - चेंबूर येथील प्लॅटफॉर्मवरील स्टॉल मागील 8 महिन्यांपासून बंद आहे. नुतनीकरणाच्या नावाखाली कंत्राटदाराला पुरेसा फंड न दिल्यानं हा स्टॉल बंद असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे हर्बल लाईनवरील स्थानकालगत अनेक विद्यालय, महाविद्यालयं, ऑफिस असल्यानं या स्टेशनवर रहदारीचं प्रमाण जास्त असतं. मात्र स्टॉल बंद असल्यानं नागरिकांना त्रास होत असल्याचं पाहायला मिळतं. याबाबत स्टेशन अधिक्षक एस.पी.सिंह यांना विचारले असता त्यांनी रेल्वे बोर्ड आणि कंत्राटदार यांच्या वादातून ही परिस्थिती निर्माण झाल्याची प्रतिक्रीया दिली. यावर लवकरात लवकर तोडगा निघेल असं त्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या