अहो..कुंड्या तरी सोडा...

 Andheri
अहो..कुंड्या तरी सोडा...
अहो..कुंड्या तरी सोडा...
अहो..कुंड्या तरी सोडा...
अहो..कुंड्या तरी सोडा...
अहो..कुंड्या तरी सोडा...
See all

अंधेरी - न्यू लिंक रोडवरील इन्फिनिटी सिटी मॉल समोरच्या फुटपाथ स्टॉलवाल्यांनी ठाण मांडलाय. महापालिकेने फुटपाथवर सुशोभीकरणासाठी झाडं लावली. पण स्टॉलवाल्यानी मात्र त्या झाडांच्या कुंडयांचा वापर आपल्या स्टॉलसाठी केलाय. केवळ फुटपाथवरच्या कुंड्या नाहीतर बसस्टॉपचा वापर स्टॉलवर येणाऱ्या ग्राहकांना बसण्यासाठी केलाय. स्टॉलवाल्यांच्या अश्या वागण्याचा नाहक त्रास पादचाऱ्यांना सहन करावा लागतोय. याबाबत वॉर्ड अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, याबाबत चौकशी करून कारवाई केली जाईल असं अधिकारी श्री.पराग म्हसूरकर म्हणाले.

Loading Comments