Advertisement

'या' फेस्टिव्हलमध्ये खा मॅगी बिर्यानी, पिझ्झा आणि बरंच काही

मुंबईत पहिल्यांदा मॅगी फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. फक्त मॅगीच नाही तर मोमोज फेस्टिव्हलचं देखील आयोजन करण्यात आलं आहे.

'या' फेस्टिव्हलमध्ये खा मॅगी बिर्यानी, पिझ्झा आणि बरंच काही
SHARES

कुणी २ मिनिट्स म्हटलं की तुमच्या मनात काय येतं? माझ्या मनात तरी मॅगी येते. तुमच्या देखील मनात मॅगीच येत असणार याची मला खात्री आहे. तुमच्या मनातल्या मॅगीचे भन्नाट असे वेगवेगळे प्रकार खायला मिळाले तर तुम्ही तावच माराल. मग ती संधी तुम्हाला लवकरच मिळणार आहे. कारण मुंबईत पहिल्यांदा मॅगी फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. फक्त मॅगीच नाही तर मोमोज फेस्टिव्हलचं देखील आयोजन करण्यात आलं आहे.


फेस्टिव्हची खासियत

फेस्टिव्हलमध्ये ५० हून अधिक मॅगीचे प्रकार खायला आहेत. पाणी टाकून बनवणारी मॅगी आपण सर्वच आवडीनं खातो. पण इथं तुम्हाला मॅगीचे असे प्रकार चाखता येणार आहेत ज्यांचा कधी तुम्ही विचारही केला नसेल. मॅगी बिर्यानी, मॅगी पिझ्झा, चीज मॅगी आणि बरंच काही तुम्हाला खाता येणार आहेत. यात आणखी भर पडते ती मोमोजमुळे. मोमोजमध्ये तुम्हाला तंदुरी मोमोज, चिकन मोमोज, चिली चीज मोमोज असे ३० प्रकार खाता येणार आहेत


खाण्याची स्पर्धा

तुम्ही मॅगी आणि मोमोजचे खरे चाहते असाल तर खाण्याच्या स्पर्धेत तर नक्कीच सहभागी व्हा. ३ मिनिटात जेवढी जास्त मॅगी तुम्ही संपवू शकाल तितकी तुमची जिंकण्याची संधी वाढेल. तर १ मिनिटांत तुम्हाला जास्तीत जास्त मोमो संपवायचे आहेत.

कुठे आहे?

मुंबईतील सर्वात मोठा मोमो आणि मॅगी फेस्टिव्हल ठाण्यात होणार आहे. ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये १२ ते १३ ऑक्टोबरला दुपारी ४ ते रात्री १०.३० पर्यंत तुम्ही फेस्टिव्हलमध्ये खादाडी करू शकता. पण आधीच सांगतोय तुम्ही तिकडे जात असाल तर रिकाम्या पोटी जा. म्हणजे कसं तुम्ही ताव मारू शकता.



हेही वाचा

मुंबईतील हे '५' हटके पिझ्झा एकदा तरी ट्राय कराच

मुंबईतल्या 'या' ५ हॉटेलमधल्या 'नॉन व्हेज'वर मारा ताव




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा